GT vs CSK IPL Qualifier 1  esakal
IPL

GT vs CSK IPL Qualifier 1 : स्कोअरबोर्डवरील डॉट बॉलच्या जागी झाडं दाखवण्यांच काय आहे गौडबंगाल?

अनिरुद्ध संकपाळ

GT vs CSK IPL Qualifier 1 Dot Ball Tree : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्जशी भिडत आहे. या सामन्यात आज टीव्हीवर दिसणाऱ्या स्कोअर बोर्डमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. ज्यावेळी एखादा गोलंदाज निर्धाव चेंडू टाकतो त्यावेळी त्या ठिकाणी डॉट येण्याच्या ऐवजी एक झाडे दिसते. हा काय प्रकार आहे याबाबत जाणून घेतले असता यामागे बीसीसीआयचा मोठा प्लॅन असल्याचे आढळून आले.

सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बीसीसीआय आयपीएलच्या 16 व्या हंगामातील प्ले ऑफमध्ये टाकण्यात आलेल्या प्रत्येक निर्धाव चेंडूमागे 500 झाडे लावण्याची योजना आखत आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच प्ले ऑफच्या सामन्यात एखाद्या गोलंदाजाने डॉट बॉल टाकला की त्या ठिकाणी झाडाचे चित्र दिसत आहे.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकात 7 बाद 172 धावात रोखले. ऋतुराजच्या 60 धावांच्या जोरावर चेन्नईने दमदार सुरूवात केली होती. त्याला डेवॉन कॉन्वे (40) देखील चांगली साथ देत होता. मात्र तो बाद झाल्यावर चेन्नईचा डाव घसरला. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी चांगला मारा करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT