RR vs GT IPL 2023 Point Table  esakal
IPL

RR vs GT : पॉईंट टेबलमध्ये पांड्याच्या टीमचाच दबदबा; गुजरातचा 9 विकेट्स अन् 37 चेंडू राखून विजय

अनिरुद्ध संकपाळ

RR vs GT IPL 2023 Point Table : गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा तब्बल 9 विकेट्स आणि 37 चेंडू राखून दारूण पराभव केला. गुजरातने राजस्थानचा त्यांच्यात घरात पराभव करत अहमदाबादमधील पराभवाचा बदला घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला गुजरातने 118 धावात गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान 13.5 षटकात 1 फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. गुजरातकडून वृद्धीमान साहाने सर्वाधिक 41 धावा केल्या तर त्याला शुभमन गिलने 36 तर हार्दिक पांड्याने 15 चेंडूत नाबाद 39 धावा करत चांगली साथ दिली.

या विजयाबरोबरच गुजरातचे 10 सामन्यात 7 विजयांसह 14 गुण झाले आहे. त्यांनी आपले अव्वल स्थान अजून मजबूत केले. तर राजस्थान 10 सामन्यापैकी 5 सामने गमावून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

राजस्थानने ठेवलेल्या 119 धावांचे माफक आव्हान पार करताना गुजरात टायटन्सचे सलामीवीर वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी 9.4 षटकातच 71 धावांची सलामी दिली. ही जोडीच गुजरातला विजय मिळवून देईल असे वाटत होते. मात्र युझवेंद्र चहलने 35 चेंडूत 36 धावा करणाऱ्या शुभमन गिलला बाद करत ही जोडी फोडली.

गिल बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने आल्या आल्या फटकेबाजी सुरू करत आपल्याला सामना लवकरात लवकर संपवून घरी जायचे असल्याचे स्पष्ट केले. त्याने 15 चेंडूतच 260 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 39 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. दुसऱ्या बाजूने सलामीवीर वृद्धीमान साहाने 5 चौकारांच्या सहाय्याने 34 चेंडूत 41 धावा करून चांगली साथ दिली.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थानचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फारसा काही फळाला आला नाही. गुजरातने त्यांचा संपूर्ण संघ 118 धावात गारद करत सामन्यावर आपली मजबूत पकड मिळवली आहे. गुजरातकडून फिरकीपटू राशिद खान आणि नूर अहमद यांनी भेदक मारा करत राजस्थानचा निम्मा संघ गारद केला. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 30 धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT