Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumors esakal
IPL

Hardik Pandya Natasa Stankovic : नेमकं असं काय झालंय... हार्दिक अन् नताशाचा होणार घटस्फोट?

Hardik Pandya Natasa Stankovic : हार्दिक पांड्याचे सध्या खराब दिवस सुरू आहेत. मैदानावर अन् वैयक्तिक आयुष्यात देखील वादळ उठलंय?

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Natasa Stankovic : भारतीय टी 20 संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याचे खराब दिवस सुरू आहेत. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यापासून रोज चाहत्यांच्या टीकेला त्याला सामोरे जावे लागते. त्यात मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएल हंगामात प्ले ऑफ गाठू शकली नाही. त्यामुळे चाहते त्याच्यावर अजून रागावले आहेत. त्यातच आता त्यांच्या वैवाहिक जिवनात देखील सगळं काही ठीक नाहीये अशी चर्चा सुरू झाली आहे.

पांड्या अन् नताशामध्ये झालंय तरी काय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक यांच्यात काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. हे दोघे एकमेकांपासून वेगळे राहत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नताशा चर्चेचा केंद्रबिंदू झाली आहे. नताशाला हार्दिकच्या आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर धमकी देखील मिळाली आहे. हार्दिक आणि नताशाने 31 मे 2020 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना अगस्त हा एक मुलगा देखील आहे.

सध्या रेडिटवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये हार्दिक पांड्या अन् नताशा वेगळं होणार आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. रेडिटवरील ही पोस्ट फक्त एक अंदाज वर्तवणारी आहे. मात्र हार्दिक आणि नताशा इन्स्टाग्रामवरील एकमेकांच्या पोस्ट लाईक करत नाहीयेत. नताशाने इन्स्टाग्रावर नताशा स्टॅन्कोविक पांड्या असा बदल केला होता. आता तिने आपलं आडनाव हटवलं आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप आमदारानं फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी सुनावणी दुसऱ्या बेंचकडे सोपवली

'या' अभिनेत्रीला 102 कोटी दंड भरण्याची डीआरआयनं बजावली नोटीस; दुबईहून सोन्याची तस्करीप्रकरणी करण्यात आलीये अटक

Sara Tendulkar: 'शुभमन गिलसोबत धोका...'! सारा गोव्याला कोणासोबत गेली होती? सिद्धार्थ केरकर कोण? नेटिझन्सकडून गिलची खिल्ली...

Pune Weather : कोकण-गोव्यासह विदर्भात पावसाची शक्यता, रायगड-सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट

Stock Market Opening: तेजीनंतर शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स 100 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT