Team India 
IPL

Team India : वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी BCCI घेणार मोठा निर्णय! युवा खेळाडूंची टीम इंडियात एट्री

भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी विश्रांती दिली जाईल त्याचवेळी...

Kiran Mahanavar

Team India : भारतीय संघाला लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जून ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर जूनच्या अखेरीस संघाला मोठ्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना व्हायचे आहे. या दौऱ्यात संघ कसोटी वनडे आणि टी-20 खेळणार आहे.

मात्र, त्याचे पूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. या काळात होणारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका धोक्यात असल्याची माहितीही गुरुवारी संध्याकाळी समोर येत होती. पण आता समोर आलेल्या ताज्या अहवालात टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध आपली युवा ब्रिगेड मैदानात उतरवू शकते, असे बोलले जात आहे.

पीटीआय मधील वृत्तानुसार, भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी विश्रांती दिली जाईल. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली दुसरी स्ट्रिंग टीम म्हणजेच युवा ब्रिगेड अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरू शकते.

विशेष म्हणजे दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर आता संघातील 15 वरिष्ठ खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. काही आधीच निघून गेले आहेत तर काही 28 मे रोजी आयपीएल फायनलनंतर जातील. हार्दिक हा कसोटी संघाचा भाग नाही, त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची जबाबदारी सांभाळू शकतो.

भारत आणि अफगाणिस्तान मालिकेची तारीख 20 ते 30 जून असु शकते. या दरम्यान बीसीसीआय एकतर एकदिवसीय किंवा फक्त टी20 मालिका करू शकते. यादरम्यान, आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंनाही टीम इंडियामध्ये प्रवेश मिळू शकतो.

त्याचबरोबर वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अशा अनेक खेळाडूंनाही या संघात प्रवेश मिळू शकतो. संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी सारखे खेळाडू या संघाचा भाग असू शकतात. तर सूर्यकुमार यादव या संघाचा महत्त्वाचा भाग असू शकतो. याशिवाय आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग आणि टिळक वर्मा असे अनेक नवे चेहरेही पाहायला मिळतील.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ हे सध्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीसाठी भारतात आहेत. आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण आयपीएल फायनलनंतर निश्चित केले जाईल. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या मालिकेची अंतिम ब्लू प्रिंटही तयार होऊ शकते.

भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर तो 12 जुलै ते 13 ऑगस्ट असा असू शकतो. यादरम्यान दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळवले जातील. या दौऱ्यानंतर संघाला आयर्लंडच्या दौऱ्यावर जायचे आहे जिथे पुन्हा एकदा युवा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. यानंतर सप्टेंबरमध्ये आशिया चषकानंतर संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे, जी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT