Virat Kohli 
IPL

Video : फिल्डरला कमकूवत समजून विराट फसला!

पराग थोडा कमी पडला आणि कोहलीला मोठा दिलासा मिळाला. पण हा क्षणात फासे पलटले.

सुशांत जाधव

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) दिलेल्या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) सुरुवात चांगली केली. पण देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मुस्तफिझुरने देवदत्त पडिक्कलला सुरेख चेंडूवर बाद केले. त्यानंतर विराट कोहलीला चोरटी धाव घेणं चांगलच महागात पडलं. बंगळुरुच्या डावातील सातव्या षटकात क्रिस मॉरिस गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रियान परागला कोहलीचा झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती. पराग थोडा कमी पडला आणि कोहलीला मोठा दिलासा मिळाला. पण हा क्षणात फासे पलटले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या कर्णधाराने पुन्हा पुढचा चेंडू रियान परागच्या दिशेने मारला. यावेळी फिल्डिंग करताना पराग थोडा गोंधळला. पण लेगच आपली चूक सुधारत त्याने संघाला विराट यश मिळवून दिले. विराट कोहली बराच वेळ परागकडे पाहात राहिला आणि त्यामुळे क्रिजमध्ये पोहचायला विराट कोहलीला उशीर झाला. रियान परागच्या डायरेक्ट हिटवर कोहलीला 25 धावांवर माघारी परतावे लागले. फिल्डर गोंधळल्याचा फायदा बंगळुरुसाठी तोट्याचा ठरला. एका धावेसाठी संघाने विराट विकेट गमावली. सोशल मीडियावर रियान परागच्या जबरदस्त फिल्गिंगचे कौतुक होत आहे. दुसरीकडे विराट कोहली अशी शुल्लक चूक कसा करु शकतो, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानची सलामी जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी माघारी फिरल्यानंतर संजू सॅमसनच्या 19 आणि क्रिस मॉरिसच्या 14 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. लुईच्या अर्धशतकाच्या जोरावर 11 व्या षटकात शतकाला गवसणी घालूनही संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थान रॉयल्सचा संघ अवघ्या 149 धावांपर्यंत मजल मारु शकला.

राजस्थानच्या संघानं दिलेले आव्हान विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलच्या दमदार खेळीसमोर फिके ठरेल, असे वाटत होते. पण ही जोडी संघाला मोठी भागीदारी करुन देण्यात अपयशी ठरली. पडिक्कल आणि कोहलीने पहिल्या विकेटसाठी 48 धावा केल्या. पडिक्कल गेल्यानंतर धावफलकावर 58 धावा असताना कोहली धावबाद होऊन परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: किमान शिक्षकांवर तरी अशी वेळ येऊ नये, हे सरकार विसरतंय का? - विजय वडेट्टीवार

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT