Suresh Raina
Suresh Raina Sakal
IPL

पराभवाच्या हॅटट्रिकनंतर CSK चाहत्यांना रैनाची आठवण; म्हणे...

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 CSK vs PBKS : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जवर पहिले तीन सामने गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना चेन्नई (Chennai Super Kings) पुन्हा एकदा यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयापासून दूर राहिली. चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतर सोशल मीडियावर सुरेश रैना (Suresh Raina) ट्रेंडिगमध्ये आला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामाआधी चेन्नई सुपर किंग्जने रैनाला रिलीज केले होते. नव्याने संघ बांधणी करताना मिस्टर आयपीएल स्पेशलिस्टसाठी चेन्नई डाव लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. पण ही चर्चा मेगा लिलावात फोल ठरली.

आयपीएलच्या मेगा लिलावात 2 कोटी मूळ किंमत असलेल्या रैनाला भावच मिळाला नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील असलेल्या रैनावर अनसोल्ड राहण्याची वेळ आली. धोनीची रैनाला साथ मिळाली नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात रैनाला मैदानात उतरण्याऐवजी काँमेंट्री बॉक्समध्ये बसून सामन्याचे समालोचन करण्याची वेळ आलीये.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नईने सुरेश रैनाकडे दुर्लक्ष केल्याचे अनेक चाहत्यांना खटकले होते. ही गोष्ट कमी होती की काय त्यात चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला. यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी धोनीकडून नेतृत्व थेट रविंद्र जडेजाकडे आले. चेन्नईकडून हे जे बदल झालेत त्याचा संघाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या पराभवानंतर चाहत्यांना आता रैनाची आठवण येत आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेकजण आपली भावना व्यक्त करत आहेत.

सलामीच्या लढतीत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात 200 धावा करुनही लखनौ सारख्या यंदाच्या हंगामातील नवख्या संघाने चेन्नईला पराभूत केलं. आता पंजाबनेही डाव साधला आहे. सलग तीन पराभवानंतर चेन्नईचे चाहते रविंद्र जडेजाला ट्रोल करत असून रैना कॅमबॅकचा नारा देतानाही दिसत आहे.

चेन्नईला दीपक चाहरच्या कमबॅकची प्रतिक्षा

CSK संघाचा स्टार गोलंदाज दीपक चाहरही आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी बोली लावत त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं होते. दीपकसाठी चेन्नईने 14 कोटी मोजले आहेत. पण तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दीपक चाहरने सरावाला सुरुवात केली असून तो लवकरच संघाच्या ताफ्यात सामील होईल, अशी चर्चा सुरु आहे. पण तो येईपर्यंत चेन्नई संघ स्पर्धेबाहेर पडेल की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT