IPL 2022 Delhi Capitals Defeat Punjab Kings Reached 4th Spot In Point Table esakal
IPL

DC vs PBKS ; दिल्लीने पंजाबला मात देत आरसीबीचे टेन्शन वाढवले

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 धावांनी पराभव करत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. दिल्लीने ठेवलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या तगड्या फलंदाजीला 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत 4 बळी टिपले. तर अक्षर पटेल, कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. पंजाबकडून जितेश शर्माने एकाकी झुंज देत 44 धावा केल्या.

दिल्लीकडून फलंदाजी करताना मिशेल मार्शने दमदार खेळी करत 63 धावा केल्या. त्याला सर्फराज खानने आक्रमक 32 धावा करून चांगली साथ दिली. पंजाबकडून लिव्हिंगस्टो अर्शदीपने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. दिल्लीच्या आजच्या विजयामुळे आरसीबीचे टेन्शन वाढले आहे. कारण दोन्ही संघ आता 14 गुणांवर आहेत. दोन्ही संघांचे एक एक सामने जिंकले आहेत. दिल्लीचे रनरेट चांगले आहे. त्यामुळे आरसीबी पुढचा सामना हरली आणि दिली जिंकली तर दिल्ली प्ले ऑफमध्ये जाईल. (IPL 2022 Delhi Capitals Defeat Punjab Kings Reached 4th Spot In Point Table RCB Tension Increase)

दिल्लीने ठेवलेले 160 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबला दिल्लीने पॉवर प्लेमध्येच तीन धक्के दिले. नॉर्त्जेने आक्रमक जॉनी बेअरस्टोला 28 धावांवर बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने शिखर धवनला 19 तर भानुका राजपक्षेला 4 धावांवर बाद केले.

शार्दुल ठाकूर आणि नॉर्त्जेने पंजाबची टॉप ऑर्डर उडवल्यानंतर दिल्लीच्या फिरकीने मधली फळी कापायला सुरूवात केली. कुलदीप यादवने खतरनाक लिव्हिंगस्टोनला 3 धाांवर बाद केले. तर अक्षर पटेलने मयांकचा शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर पुन्हा एकदा कुलदीपने पंजाबला धक्का देत हरप्रीत ब्रारला अवघ्या 1धावेवर पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर अक्षरने ऋषी धवनचा 4 धावांवर त्रिफळा उडवत पंजाबची अवस्था 7 बाद 82 धावा अशी केली.

पंजाबची पडझड होत असताना जितेश शर्माने झुंजार खेळी करत संघाला शतक पार करून दिले. मात्र अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या जितेश शर्माला (44) शार्दुल ठाकूरने 18 व्या षटकात बाद करत पंजाबला आठवा धक्का दिला. त्यानंतर षटकार मारणाऱ्या रबाडाची (6) देखील शिकार केली. ही शार्दुलची चौथी शिकार होती. दरम्यान, राहुल चाहरने झुंज देत 24 धावांची खेळी केली. मात्र त्याला पंजाबचा पराभव टाळता आला नाही.

आयपीएलच्या 64 व्या सामन्यात पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मयांक अग्रवालने पहिलेच षटक लिम लिव्हिंगस्टोनला देत आश्चर्याचा धक्का दिला. तर लिव्हिंगस्टोनने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला.

डेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सलामीवीर सर्फराज खानने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याने 16 चेंडूत 32 धावा ठोकत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र त्याला अर्शदीप सिंगने 32 धावांवर बाद केले. सर्फराज खान बाद झाल्यानंतर ललित यादव आणि मिशेल मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ललित यादवने 24 धावा करत मार्शची साथ सोडली. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले.

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद करणाऱ्या लिम लिव्हिंगस्टोनने दिल्लीच्या मधल्या फळीला देखील धक्के दिले. त्याने ऋषभ पंतला 7 तर रोव्हमन पॉवेलला 2 धावांवर बाद केले. दिल्लीचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना मिशेल मार्शने झुंजार खेळी करत अर्धशतक ठोकले. मात्र त्याला रबाडाने 63 धावांवर बाद केले. दिल्लीने कसाबसा 150 चा टप्पा पार केल्यानंतर शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने शार्दुल ठाकूरला 3 धावांवर बाद करत आपली तिसरी शिकार केली. अखेर दिल्लीने 20 षटकात 7 बाद 159 धावांपर्यंत मजल मराली. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर रबाडाने एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT