MI vs PBKSL Rohti Sharma
MI vs PBKSL Rohti Sharma Sakal
IPL

IPL 2022 : छोट्याखानी खेळीत रोहितचा मोठा विक्रम

सकाळ डिजिटल टीम

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित रोहित शर्माने (Rohit Sharma) पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पण छोट्याखानी खेळीनं त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध पुण्याच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात 25 वी धाव घेताच रोहितच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा त्याने पार केला. अशी कामगिरी करणारा भारताचा तो दुसरा खेळाडू ठरलाय. क्रिकेट जगतातील खेळाडूंमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. याआधी भारताकडून ही कामगिरी विराट कोहलीने केली आहे. आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांचाही यात समावेश आहे.

पंजाब विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि मयंक अग्रवालच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने पहिल्यांदा बॅटिंग करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 198 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहितने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. तो या महत्त्वपूर्ण सामन्यात मोठी खेळी करेल, असे वाटत होते. पण रबाडाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारताना तो बाद झाला. त्याने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 28 धावांची खेळी केली. त्याच्या खात्यात आता टी-10 क्रिकेटमध्ये 10000 + धावा जमा झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

SCROLL FOR NEXT