IPL 2022 Mystery Girl
IPL 2022 Mystery Girl Sakal News
IPL

IPL 2022 Mystery Girl : 'मिस्ट्री गर्ल'मुळे कॅमेरामन ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (Channai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सामना चाहत्यांच्या उपस्थितीत पार पडला. या सामन्यात खेळाडूंच्या खेळीशिवाय टीव्हीवर झळकलेल्या एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या धावफलकावर 4 बाद 52 धावा असताना टिव्ही स्क्रीनवर एक तरुणी (IPL 2022 Mystery Girl) काही सेकंद स्क्रीनवर झळकली. त तरुणीच्या रिअ‍ॅक्शनवर सोशल मीडियावर अल्पावधीत अनेक मीम्स तयार झाल्याचे पाहायला मिळाले.

एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी या तरुणीसाठी कॅमेरामनलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली. पहिल्या सामन्यापासूनच कॅमेरामन आपल्या कामाला लागला, अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काहींनी कॅमेरामनची फिरकी घेतली आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात तमाम चाहत्यांच्या गर्दीत कॅमेरामनला स्टेडियममधील सुंदर चेहरा दाखवण्याचा मोह अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळते. पुन्हा त्याची झलक पाहायला मिळाली.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात गतविजेत्या आणि चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नईला कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाताने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जनं निर्धारित 20 षटकात 131 धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान कोलकाताने 6 गडी आणि 9 चेंडू राखून पार केले. सलामीवीर अजिंक्य रहाणेनं 44 धावांची उपयुक्त खेळी केली. तर श्रेयस अय्यर सामना जिंकून देत नाबाद परतला. कोलकाताच्या विजयात जलदगती गोलंदाज उमेश यादवने सिंहाचा वाटा उचलला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT