Umesh Yadav Record Sakal
IPL

IPL Record : उमेश यादवचा 'सिक्सर'; रोहित-गेलला 'धोबीपछाड'

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 PBKS vs KKR : पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिमाखदार विजयाची नोंद केली. कोलकाताकडून उमेश यादवनं (Umesh Yadav) आपल्या कोट्यातील 4 षटकातील एक षटक निर्धाव टाकत 23 धावा खर्च करुन चार विकेट्स घेतल्या. विकेट्सच्या या चौकाराच्या जोरावरच कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) हा सामना सहज आणि सोपा झाला. मॅच विनिंग कामगिरीबद्दल उमेश यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कारासह त्याने खास विक्रम आपल्या नावे केलाय. पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या त्याने सहाव्यांदा मॅन ऑफ द मॅच किताब पटकवलाय. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा सामनावीर होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वलस्थानी विराजमान झालाय. या आधी युसूफ पठाण (Yusuf Pathan ), रोहित शर्मा (Rohit Sharam )आणि ख्रिस गेल (Gayle) हे तीन दिग्गज त्याच्यापुढे होते. युसूफ पठाणने डेक्कन चार्जर्स, रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्स तर ख्रिस गेलनं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या लढतीत प्रत्येकी पाच-पाच वेळा सामनावीराचा बहुमान मिळवला होता. या तिघांना मागे टाकत उमेश यादव नंबर वन ठरलाय.

सलामीच्या लढतीत देखील उमेश यादवनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली होती. या सामन्यात त्याने सुरुवातीलाच 2 महत्वपूर्ण विकेट्स घेत चेन्नईला बॅकफूटवर ढकलले होते. चेन्नईचा सलामीवीर आणि गतहंगामातील ऑरेंज कॅप होल्डर ऋतूराज गायकवाड आणि ड्वेन कॉन्वे यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला होता. बंगळुरु विरुद्धच्या सामन्यातही त्याने दोन विकेट घेतल्या. यात किंग कोहलीच्या विकेटसह अनुज रावत या युवा खेळाडूचा समावेश होता. पंजाब विरुद्धच्या लढतीतीत चार विकेटनंतर आता त्याच्या खात्यात 8 विकेट जमा झाल्या आहेत. तो आता पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वलस्थानी पोहचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

SCROLL FOR NEXT