faf du plessis and virat kohli  Sakal
IPL

IPL 2022 : फाफ-विराट जोडी बघून RCB चाहत्यांना आठवला एबी

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामातील तिसरा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. या सामन्यातून फाफ डु प्लेसीसने कॅप्टन्सीची नवी इनिंग सुरु केली. त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. दमदार फलंदाजीनंतर खराब गोलंदाजी बंगळुरुला महागात पडली. बंगळुरुकडून विराट कोहलीची कॅप्टन्सीची जागा घेतलेल्या फाफ ड्युप्लेसी याने 88 धावांची दमदार खेळी केली. बंगळुरुचा संघ पराभूत झाला असला तरी या सामन्यात विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसीस यांच्यातील खेळीमेळीचे वातावरणानं अनेक चाहत्यांची मनं जिंकली.

विराट-फाफ दोघांनी मिळून RCB साठी 10 षटकात 118 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 1 चौकार आणि 2 षटकार खेचत 29 चेंडूत 41 धावा केल्या. फाफने 57 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकाराच्या मदतीने 88 धावा केल्या. फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणावेळी दोघांच्या कमालीचा ताळमेळ पाहायला मिळाला. आपल्या जागी घेणाऱ्या फाफसोबत विराट पहिली मॅच खेळतोय असं वाटतही नव्हते. या दोघांना पाहून आरसीबीच्या चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सची आठवण आली.

दक्षिण आफ्रिकेचा फाफ ड्युप्लेसीस पहिल्यांदाच RCB च्या जर्सीत मैदानात उतरला आहे. याआधी तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसले होते. आयपीएलच्या मेगा लिलावात आरसीबीने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. अनुभवाच्या जोरावर विराटने खाली केलेल्या कॅप्टन्सीसाठी त्याला पंसतीही मिळाली. पंजाब विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसीस दोघेही गोलंदाजांना प्रोत्साहित करताना दिसले. फाफ ड्युप्लीसीस विराटला बघितल्यानंतर लोक या जोडीसह एबी विराटचे फोटो शेअर करताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abrar Ahmed Video : भारताच्या 'गब्बर' ला बुक्क्याने मारायची इच्छा! मुंडी हलवणाऱ्या पाकिस्तानानी खेळाडूचं धाडस ऐका...

Education News : शिक्षणाधिकारीच अडकले! विस्तार अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून बदलीसाठी 'अवघड क्षेत्रा'ची खोटी माहिती; दिंडोरीत खळबळ

Tata Trusts: टाटा ग्रुपमध्ये वाद! 157 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रस्टमध्ये दोन गट, काय आहे प्रकरण?

Nobel Prize 2025 : क्वांटम संशोधनाला सलाम! जगाला आश्चर्यकारक फायदा; तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

Gold Crash: सोन्याचा फुगा लवकरच फुटणार; भाव 77,700 रुपयांवर येणार, तज्ञांचा धक्कादायक इशारा

SCROLL FOR NEXT