dhanashree varma and yuzvendra chahal  Sakal
IPL

IPL 2022 : चहलचा फ्लाईंग किस, धनश्री खुदकन हसली (VIDEO)

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 : पुण्याच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत सनरायझर्सं हैदराबादला 61 धावांनी पराभूत केले. मागील काही हंगामातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यंदाच्या हंगामापासून राजस्थानच्या ताफ्यात सामील झालाय. सलामीच्या लढतीत संघाच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला. अभिषेक शर्माच्या रुपात चहलने सामन्यात पहिले यश मिळवले. हेटमायने हैदराबादच्या सलामीवीराचा झेल घेतला. या पहिल्या विकेटनंतर चहलने पत्नी धनश्री वर्माला (Dhanashree Verma) फ्लाईंग किस देत सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलने 22 धावा खर्च करुन तीन विकेट्स घेतल्या. विकेटचा आनंद व्यक्त करताना तो हटके सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. हा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि डान्स नृत्य दिग्दर्शिका अशी ओळख असलेली धनश्री वर्माही स्टेडियमवर उपस्थितीत होती. चहलने विकेट घेतल्यावर तिच्याकडे बघत फ्लाइंग किस सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. चहलचा हा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. त्याच्याशिवाय धनश्रीनं स्टँडमधील खास फोटोही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. या फोटोलाही चांगली पसंती मिळताना दिसते.

चहलने सलामीवीर अभिषेक शर्माशिवाय अष्टपैलू अब्दुल समद याचीही महत्त्वपूर्ण विकेट घेतली. हैदाबादकडून फटकेबाजी करण्याचे संकेत दिलेल्या रोमारिया शेफर्डला Romario Shepherd त्याने बोल्ड केलं. युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्व खेळाडू ठरणार अशी चर्चा तो संघात सामील झाल्यापासून सुरु होती. पहिल्याच सामन्यात ही चर्चा उगाच रंगली नव्हती याचे संकेतच त्याने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT