IPL 2023 Who is Suyash Sharma KKR teen mystery who bamboozled RCB on IPL debut  
IPL

IPL 2023 Suyash Sharma: पहिल्याच सामन्यात काटा किर कामगिरी; केकेआरला कसा मिळाला सुयश?

पदार्पणातच आरसीबीच्या फलंदाजांना नाचवलं

धनश्री ओतारी

Who is Suyash Sharma: कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात गुरुवारी आयपीएलमधील चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण क्रिकेट विश्वात केकेआरच्या विजयासोबत चर्चा सुरु आहे ती म्हणजे सुयश शर्माची.

पदार्पणातच आरसीबीच्या फलंदाजांना नाचवलं अन् क्रिकेट वर्तुळात आपला दबदबा निर्माण केला. (IPL 2023 Who is Suyash Sharma KKR teen mystery who bamboozled RCB on IPL debut )

केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सुयश संघात समावेश केला. सुयशने या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पदार्पण केले असले तरी ते त्याचे हे पदार्पण दणक्यात झाले.

आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने दिनेश कार्तिक ९ आणि अनुज रावतला अवघ्या १ धावेवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवून सर्वांनाच चकित केले होते. त्याने १३व्या षटकात दोन्ही फलंदाजांना बाद केले.

सुयशने पहिल्या तीन षटकात केवळ १८ धावा देत ३ विकेट घेतले. त्याने तिसरी विकेट म्हणून कर्ण शर्माला एका धावेवर बाद केले. सुयशने ४ षटकात ३० धावा देत ३ विकेट घेतले.

सुयश शर्माने केकेआरकडून ईडन गार्डन्सवर आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो वरुण चक्रवर्तीसारखा मिस्ट्री स्पिनर आहे. आयपीएल २०२३ च्या लिलावात त्याची मूळ किंमत २० लाख रुपये आहे.

शर्मा हा दिल्लीचा आहे आणि विशेष बाब म्हणजे याआधी तो लिस्ट ए, फर्स्ट क्लास किंवा टी-२० सामना खेळला नव्हता. स्पर्धात्मक क्रिकेटमधला हा त्याचा पहिलाच सामना होता, पण पहिल्याच सामन्यात त्याच्या शानदार गोलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२० वर्षांच्या सुयश शर्माने दिल्लीत ज्युनिअर स्तरावर क्रिकेट खेळले आहे. येथे क्रिकेट खेळताना तो त्याच्या गोलंदाजीमुळे दिल्ली वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. केकेआरने टॅलेंट स्काउटद्वारे त्याची निवड केली.

केकेआरने त्याला आयपीएल लिलावात 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणतात, सुयश हा केकेआर स्काउटचा शोध आहे, ज्याने त्याला अंडर-25 सामन्यादरम्यान ओळखले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

SCROLL FOR NEXT