Ishant Sharma IPL 2023  esakal
IPL

Ishant Sharma IPL 2023 : तब्बल 717 दिवसांनी IPL सामना खेळला अन् दिल्लीने मिळवला हंगामातील पहिला विजय

अनिरुद्ध संकपाळ

Ishant Sharma IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने तब्बल 5 पराभवानंतर आयपीएल 2023 मधील आपला पहिला विजय मिळवला. दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 विकेट्सनी पराभव केला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दिल्लीने दमदार गोलंदाजी करत 20 षटकात 127 धावात गुंडाळले. दिल्लीकडून तब्बल दोन वर्षांनी आयपीएल सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने 4 षटकात 19 धावा देत 2 बळी टिपले. याचबरोबर नॉर्त्जे, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी देखील दोन विकेट्स घेतल्या. मात्र जास्त चर्चा झाली ती इशांत शर्माची!

35 वर्षाच्या इशांत शर्माने केकेआरचा कर्णधार नितीश राणा आणि सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता असणाऱ्या सुनिल नरेनची विकेट घेतली. त्याने आपल्या 4 षटकात फक्त 19 धावा दिल्या. त्याने 140 किलोमिटर प्रतीसात वेगाने गोलंदाजी केली.

इशांत शर्मासाठी ही कामगिरी खास आहे. इशांत आपल्या कारकिर्दीच्या उतरंडीला लागला आहे. भारताचा एक उंचपुरा इनस्विंगर ज्याने ऑस्ट्रेलियाच्या भल्या भल्या फलंदाजांची बोलती बंद केली होती. तो भारतीय संघातील आपले स्थान टिकवू शकला नाही.

सुरूवातीला त्याला वनडे आणि टी 20 संघातील आपले स्थान गमावावे लागले. तो फक्त कसोटीत खेळाडू राहिला होता. कालांतराने त्याची कामगिरी खालावली. दुखापती वाढल्या अन् तो भारतीय कसोटी संघातूनही साईडलाईन झाला. पर्यायाने आयपीएलमधील संधीही खालावत गेल्या.

इशांत शर्माचे वडील हे एअर कंडीशनची दुरूस्ती करण्याचा व्यवसाय करत होते. हे एक हंगामी काम असल्याने चार ते पाच महिन्याच्या कमाईवर त्यांना संपूर्ण वर्षाचा खर्च काढावा लागत होता. अशा परिस्थिती इशांत शर्माने आपली क्रिकेटची आवड जपली आणि अवघ्या 19 व्या वर्षी इशांतला भारतीय संघात स्थान मिळाले.

इशांतसाठी 2008 चा ऑस्ट्रेलिया दौरा आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने या दौऱ्या रिकी पॉटिंगला खूप सतावले होते. इशांतला या दौऱ्यावर मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता.

इशांत भारतासाठी 2013 मध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला. इशांत आयपीएलच्या सुरूवातीचा काळ हा केकेआरकडून खेळला. त्याने आपल्या कारकिर्दीत 311 कसोटी, 115 वनडे आणि 8 टी 20 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 75 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: सत्तेची गणितं उलथवणार का हा निकाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल

Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी’च्या पंधराव्या सीझनची थरारक झलक, रोहित शेट्टी पुन्हा होस्ट

ZP Election Result: ग्रामीणचा शिलेदार कोण? आज मतमोजणी; ५०२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

MPSC Recruitment Update : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 2 लाख 17 हजारांहून अधिक पदांची होणार भरती? परीक्षा व भरती प्रक्रियेतही बदलांची शक्यता

Kolhapur ZP : पहिला गुलाल दुपारी १२ वाजता! जिल्हा परिषद निवडणुकीचा थरार शिगेला २५० टेबलांवर मतमोजणी, १८८ फेऱ्या

SCROLL FOR NEXT