Jasprit Bumrah Impact Player IPL 2024  esakal
IPL

Jasprit Bumrah Impact Player : गोलंदाजचं मरण... फलंदाजाला खुली सूट... बीसीसीआयच्या नियमावर बुमराहची कडक प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah Impact Player IPL 2024 : आयपीएल 2024 च्या हंगामात बीसीसीआयने एक नवा नियम लागू केला आहे. आयपीएलमध्ये आता संघ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सामना सुरू असताना एखादा बदल करू शकतो. या नियमाचा वापर सुरू झाल्यापासून यंदाच्या हंगामात धावांचा पाऊस पडताना दिसतोय. यावर अनेक खेळाडूंनी टीका देखील केली आहे.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मानंतर आता त्यांचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील इम्पॅक्ट प्लेअरमुळं गोलंदाजांच जगणं अजून कठिण झालं असल्याचं मत व्यक्त केलं.

पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या जसप्रीत बुमराहने टॉप ऑर्डरमधील तीन विकेट्स झटपट मिळवल्या होत्या. मात्र तरी देखील मुंबईला सामना लवकर संपवता आला नाही. पंजाबच्या सातव्या आणि आठव्या फलंदाजांनी सामना अटीतटीचा केला.

यावर जसप्रीत बुमराह म्हणाला की, 'हा खूप अटीतटीचा सामना झाला आहे. आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षाही जास्त अटीतटीचा झाला.' टी20 क्रिकेटमध्ये मिळणारी मर्यादित षटके आणि नवीन नियमामुळे गोलंदाजांपुढे मोठं आव्हान असल्याची बुमराहला जाणीव आहे.

जसप्रीत बुमराह म्हणतो की, 'हा फॉरमॅटम गोलंदाजांसाठी थोडा कठिण आहे. वेळचं बंधन आहे आणि इम्पॅक्ट प्लेअर नियम! यामुळे फलंदाजांना गोलंदाजांविरूद्ध अधिक आक्रमकपणे खेळण्याची सूट मिळते. त्यामुळे गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करणं शक्य होत नाही. या नियमामुळे गोलंदाज त्याच्या अर्ध्या क्षमतेने गोलंदाजी करू शकतो.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT