Jos Buttler Equals Virat Kohli Most Century in Season Record Rajasthan Royals Defeat Royal Challengers Bangalore
Jos Buttler Equals Virat Kohli Most Century in Season Record Rajasthan Royals Defeat Royal Challengers Bangalore ESAKAL
IPL

RCB vs RR : आरसीबीचा चोकरचा शिक्का कायम; राजस्थान दुसऱ्यांदा फायनलमध्ये

अनिरुद्ध संकपाळ

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने 60 चेंडूत 106 धावा ठोकल्या. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल गाठली. आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी फायनल सामना होईल. (Jos Buttler Equals Virat Kohli Most Century in Season Record Rajasthan Royals Defeat Royal Challengers Bangalore)

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी पाचव्या षटकातच संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र जॉस हेजवलूडने जैसवालला 21 धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला.

दरम्यान, जॉस बटलरने आपल्या गिअर बदलत 23 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. त्याने कर्णधार संजू सॅमसनच्या साथीने 10 व्या षटकातच संघाचे शतक धावफलकावर लावले. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली. मात्र हसरंगाने सॅमसनला 23 धावांवर बाद केले. यानंतर जॉस बटलरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला दीडशताच्या जवळ पोहचवले. मात्र हेजलवूडने 9 धावा करणाऱ्या पडिक्कलला बाद करत राजस्थानला तिसरा धक्का दिला.

दरम्यान, सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज होती आणि बटलर 99 धावांवर होता. त्याने एक धाव घेत आयपीएलच्या एका हंगामातील चौथे शतक ठोकले. याचबरोबर त्याने विराट कोहलीच्या एका हंगामात चार शतके ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराट कोहलीने हा विक्रम 2016 ला केला होता. या विक्रमानंतर बटलरने षटकार मारत सामना संपवला. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल गाठली.

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध कृष्णाने विराट कोहलीला 7 धावांवर बाद करत रॉयल चॅलेंजर बेंगलोरला (Royal Challenger Bangalore) पहिला धक्का दिला. त्यानंतर रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि फाफ ड्युप्लेसिसने डाव सावरत 70 धावांची भागीदारी रचली. दुसऱ्या विकेटसाठी रजत पाटीदार बरोबर 70 धावांची भागीदारी रचणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसला आर. मॅकॉयने 25 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल 24 धावांची भर घालून माघारी गेला. दरम्यान, रजत पाटीदारने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर रजत पाटीदार लगेचच बाद झाला. त्यानंतर मात्र प्रसिद्ध कृष्णा आणि मॅकॉयच्या भेदक माऱ्यासमोर एकही फलंदाजी तग धरू शकला नाही. अखेर आरसीबीचा डाव 20 षटकात 8 बाद 157 धावांवर संपला. मॅकॉयने 23 धावात 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 22 धावात 3 बळी टिपले. अश्विन आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT