MS Dhoni CSK vs RR Retirement  Esakal
IPL

MS Dhoni CSK vs RR : चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर... राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni CSK vs RR Retirement Speculation : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्तान रॉयल्स यांच्यातील रविवारच्या सामन्याची जबरदस्त क्रेज आहे. कारण हा महेंद्रसिंह धोनीचा चेन्नईवरील शेवटचा सामना असू शकतो. त्यामुळे चेन्नईच्या फॅन्स चेपॉक स्टेडियमवर गर्दी केली आहे.

दरम्यान, सामना सुरू होण्यास काही अवधी असतानाच चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक गुढ पोस्ट केली. या पोस्टमुळे राजस्थानविरूद्धच्या सामन्यानंतर धोनी निवृत्ती घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

सीएसकेने पोस्ट केली की, 'सर्व चाहत्यांना सामन्यानंतर थांबण्याची विनंती करण्यात येत आहे. तुमच्यासाठी काही खास होणार आहे.' या पोस्टनंतर धोनी निवृत्ती घेणार का अशी चर्चा सीएसकेचेच नाही तर सर्व भारतीय क्रिकेट चाहते करत आहेत.

सीएसके चाहत्यांसाठी पुढेच तीन ते चार तास हे खूप महत्वाचे असणार आहेत. धोनी आणि सीएसकेचे चाहते चेपॉकवरून काय जाहीर केलं जातं याचा विचार करत नखं कुरतडत बसले आहेत. चाहत्यांना आशा आहे की मी अजून एक वर्ष खेळणार असं धोनी सामन्यानंतर सांगेल.

महेंद्रसिंह धोनीने 2008 पासून आतापर्यंत चेन्नईकडून 262 सामने खेळले आहेत. पहिल्या हंगामातच धोनीने सीएसके जॉईन केलं होतं. त्यानं सीएसकेकडून आतापर्यंत 5218 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 39 असून त्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने सीएसकेला पाच आयपीएल टायटल जिंकून दिले आहेत.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

SCROLL FOR NEXT