Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad IPL 2024  ESAKAL
IPL

MI vs SRH : चेन्नईनं हैदराबादचं टेन्शन वाढवलं आता मुंबई मोठा धक्का देणार?

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad IPL 2024 : पाच वेळा अजिंक्यपद पटकावलेला मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएल मोसमात सुमार कामगिरी करीत आहे. मुंबईच्या संघाला अकरा सामन्यांमधून फक्त तीनच सामन्यांत विजय मिळवता आले आहेत. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. याच कारणामुळे मुंबईला उर्वरित तीन लढतींमध्ये प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवावे लागणार आहेत.

घरच्या मैदानावर उद्या (ता. ६) होत असलेल्या लढतीत त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. सहा सामन्यांत यश मिळवणाऱ्या हैदराबाद संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजय मिळवणे गरजेचे आहे. चेन्नई सुपर किंग्जने पंजाबचा पराभव करत टॉप 4 मध्ये स्थान पटकावलं आहे. त्यामुळे हैदराबादसाठी मुंबईविरूद्धची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

कर्णधार हार्दिक पंड्या, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव या तीन खेळाडूंचा फॉर्म मुंबईसाठीच नव्हे तर भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. रोहित (३२६ धावा), सूर्यकुमार (२३२ धावा), हार्दिक (१९८ धावा) यांना उर्वरित लढतींमधून चमक दाखवावी लागणार आहे. टी-२० विश्‍वकरंडकाआधी आत्मविश्‍वास कमवणे ही बाब मोलाची ठरणार आहे. जसप्रीत बुमराने गोलंदाजीत आतापर्यंत १७ विकेट घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याला विश्रांती देण्यात आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही; पण प्रत्यक्षात त्याला बाहेर बसवण्यात येईल, असे वाटत नाही.

चौकडीवर नजर

यंदाच्या आयपीएल मोसमात हैदराबादच्या संघातून खेळताना चार फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ट्रॅव्हिस हेड (३९६ धावा), हेनरिक क्लासेन (३३७ धावा), अभिषेक शर्मा (३१५ धावा) व नितीशकुमार रेड्डी (२१९ धावा) या चारही फलंदाजांनी ठसा उमटवला आहे. मुंबईच्या गोलंदाजांसमोर या चारही खेळाडूंना रोखण्याचे आव्हान असणार आहे. एडन मार्करम व अब्दुल समद यांना मात्र अद्याप सूर गवसलेला नाही.

राजस्थानविरुद्धच्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावला

हैदराबादने मागील लढतीत राजस्थानविरुद्ध खेळताना एक धावेने सनसनाटी विजय मिळवला. अव्वल संघाविरुद्ध विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल. भुवनेश्‍वरकुमारने या लढतीत प्रभावी कामगिरी केली. याआधीपर्यंत त्याला गोलंदाजीत यश मिळत नव्हते. त्यामुळे भुवीचा फॉर्मही त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पॅट कमिन्सनला गोलंदाजीत साथ मिळाल्यास मुंबईवर त्यांना वर्चस्व गाजवता येऊ शकते.

धावांचा पाऊस पडणार?

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत धावांचा पाऊस पडला आहे. फक्त मागील कोलकता- मुंबई यांच्यामधील लढतीत कमी धावसंख्या उभारण्यात आली; पण या लढतीचा अपवाद होता. वानखेडेची सीमारेषाही लहान आहे. त्यामुळे खेळपट्टी फलंदाजांना पोषक असल्यास या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल यात शंका नाही.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT