Rajat Patidar 2nd batsmen in the list of Most runs in a season IPL Play Offs ESAKAL
IPL

रजतने केले खास रेकॉर्ड; वॉर्नरनंतर झळकणार पाटीदारचे नाव

अनिरुद्ध संकपाळ

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध कृष्णाने विराट कोहलीला 7 धावांवर बाद करत रॉयल चॅलेंजर बेंगलोरला (Royal Challenger Bangalore) पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि फाफ ड्युप्लेसिसने डाव सावरत 70 धावांची भागीदारी रचली. मात्र रजत पाटीदारला साथ देणारे एक एक फलंदाज माघारी चालले होते. मात्र रजतने झुंजार अर्धशतक पूर्ण करत आरसीबीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे प्ले ऑफमध्ये त्याने एलिमनेटर सामन्यात शतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्याच सामन्यात अर्धशतक झळकावले.

रजत पाटीदारने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकत एका खास यादीत आपले नाव समाविष्ट केले. एका हंगामात प्ले ऑफमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत रजत पाटीदार आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत डेव्हिड वॉर्नर 190 धावा करून अव्वल स्थानावर आहे. त्याने 2016 च्या आयपीएल हंगामात या धावा केल्या होत्या. त्यानंतर रजत पाटीदारचा नंबर लागतो. त्याने यंदाच्या हंगामात 170 धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुरली विजयचा नंबर लागतो. त्याने 2012 च्या आयपीएल हंगामात 156 धावा केल्या होत्या. तर 2014 मध्ये वृद्धीमान साहाने 156 धावा केल्या होत्या. तो यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

आरसीबीच्या रजत पाटीदारने जरी 42 चेंडूत 58 धावांची खेळी केली असली तरी राजस्थानच्या ऑबे मॅकॉय आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भेदक मारा करत आरसीबीला 20 षटकात 8 बाद 157 धावांवरच रोखले. मॅकॉयने 23 धावात 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 22 धावात 3 बळी टिपले. अश्विन आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मंत्री संजय राठोड याचं वर्चस्व कायम; यवतमाळमधील दारव्हा, नेर पालिकेवर नगराध्यक्ष विजयी

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले

Uttarakhand Tourism: उत्तराखंडला फिरायला जाताय? लपलेली मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं अनुभवायला विसरू नका!

SCROLL FOR NEXT