Rashid Khan last Two Ball Two Sixes
Rashid Khan last Two Ball Two Sixes ESAKAL
IPL

GT vs SRH : गुजरातच्या राशिद खानने पराभवाचे काढले उट्टे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गुजरातच्या राशिद खान (Rashid Khan) आणि राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) शेवटच्या दोन षटकात 35 धावा ठोकत हैदराबादचा विजयी घास हिसकावून घेतला. राशिद खानने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत हैदराबादचे 196 धावांचे आव्हान पार केले. यंदाच्या हंगामातील गुजरातचा एकमेव पराभव हा सनराईजर्स हैदराबादने केला होता. त्याचा बदला गुजारातने आज घेतला. हैदराबादकडून उमरान मलिकने (Umran Malik) 4 षटकात 25 धावा देत 5 विकेट घेतल्या. मात्र मार्को येनसेनने (Marco Jansen) त्याच्या कष्टावर पाणी फेरले. अखेरच्या षटकात 25 धावा दिल्या. गुजराकडून राहुल तेवतियाने आक्रमक 40 तर राशिद खानने 31 धावा चोपल्या. या विजयाचा पाया वृद्धीमान साहाच्या 68 धावांनी रचला गेला.

सनराईजर्स हैदराबादने ठेवलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सनेही दमदार सुरूवात केली. सलामीवीर वृद्धीमान साहा आणि शुभमन गिलने पॉवर प्लेमध्ये बिनबाद 59 धावा केल्या. त्यात वृद्धीमान साहाच्या 18 चेंडूत केलेल्या 39 धावांचा मोठा वाटा होता.

मात्र या चांगल्या सुरूवातीनंतर हैदराबादच्या उमरान मलिकने गुजरातला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा शुभमन गिलचा 22 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याला 10 धावांवर बाद केले. दरम्यान, साहाने आपले अर्धशतक पूर्ण करत डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 12 व्या षटकात गुजराचे शतक धावफलकावर लावले.

मात्र पुन्हा एकदा उमरान मलिकने एक अप्रतिम यॉर्कर टाकत वृद्धीमानची 68 धावांची खेळी संपवली. साहा बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उमरानने त्याचाही 17 धावांवर त्रिफळा उडवला. पाठोपाठ त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिनव मनोहरचा शुन्यावर त्रिफळा उडवात आपली पाचवी शिकार केली. विशेष म्हणजे उमरानने गुजरातचे पहिले पाच फलंदाज एकट्यानेच बाद केले.

दरम्यान, गुजरातच्या राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्यांनी सामना 12 चेंडूत 35 धावा असा आणला. 19 वे षटक टाकणाऱ्या टी नटराजनने 13 धाव दिल्या. त्यामुळे आता गुजरातला अखेरच्या षटकात विजयासाठी 22 धावांची गरज होती.

त्यावेळी तेवतियाने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सामन्यात रंगत भरली. मात्र त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तेवतियाने एक धाव केली. पुढच्या तिसऱ्या चेंडूवर राशिद खानने षटकार खेचत सामना 3 चेंडूत 9 धावा असा आणला. येनसेने चौथा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर राशिद खानने शेवटच्या दोन चेंडूवर सलग दोन षटकार मारत सामना जिंकून दिला. राहुल तेवतियाने 21 चेंडूत 40 धावा चोपल्या तर राशिद खानने 11 चेंडूत 31 धावा केल्या.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्येच सनाईजर्स हैदराबादला दोन धक्के दिले. मोहम्मद शामीने (Mohammed Shami) दमदार गोलंदाजी करत हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला (Ken Williamson) 5 तर आक्रमक राहुल त्रिपाठीला 16 धावांवर बाद केले. त्यामुळे हैदराबादची अवस्था 2 बाद 44 धावा अशी झाली होती.

मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा आणि एडिन माक्ररमने तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची बागीदारी रचली. अभिषेक शर्माने 42 चेंडूत 65 धावांची खेळी केली. मात्र तो बाद झाल्यानंतर हैदराबादची गळती सुरू झाली. मोहम्मद शामीने निकोलस पूरनला 3 धावांवर बाद करत सामन्यातील तिसरी शिकार केली. त्यानंतर अर्धशतक माक्ररमही (56) अर्धशतकानंतर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर देखील 3 धावांची भर घालून धावबाद झाला.

अखेर मार्को जेनसेन आणि शशांक सिंगने फर्ग्युसन टाकत असलेल्या शेवटच्या षटकात 25 धावा चोपून हैदराबादला 195 धावांपर्यंत पोहचवले. शशांकने 6 चेंडूत 25 तर जेनसेनने 5 चेंडूत 8 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT