ravichandran ashwin wife prithi narayanan reaction sakal
IPL

आर. अश्विनच्या अर्धशतकवर पत्नी प्रीतिची रिअ‍ॅक्शन व्हायरल! पाहा फोटो

सामन्यात असे काही घडले, जे आजच्या आधी आयपीएलच्या इतिहासात कधीही घडले नव्हते

सकाळ ऑनलाईन टीम

IPL Ashwin Wife Prithi Reaction: आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. सामन्यात असे काही घडले, जे आजच्या आधी आयपीएलच्या इतिहासात कधीही घडले नव्हते. राजस्थान रॉयल्सचा ऑफ-स्पिन अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रीतीची रिएक्शन सोशल मीडियावर रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सने स्वतः ट्विटरवर त्यांच्या पोस्टद्वारे हा संस्मरणीय क्षण शेअर केला आहे.(Ravichandran Ashwin Wife Prithi Narayanan Reaction)

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे ​​टी-20 कारकिर्दीतील हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो क्रमांक 3 वर फलंदाजी करायला आला होता. अश्विनला या हंगामात अनेक सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पण आज त्याचा पुरेपूर फायदा करत त्याने पहिले टी-२० अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने 38 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी खेळली. त्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रविचंद्रन अश्विनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक झळकावताच त्याची पत्नी प्रीतीची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी होती. अश्विनने अर्धशतक पूर्ण करताच त्याची पत्नी हसताना दिसली आणि टाळ्या वाजवून अश्विनला प्रोत्साहन दिले.

रविचंद्रन अश्विनने या सामन्यात भलेही अर्धशतक केले असेल, परंतु या सामन्यात त्याचा संघाला दिल्ली कॅपिटल्सकडून 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकांत पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT