ravindra jadeja out the ipl 2022 
IPL

CSK ला मोठा धक्का; रवींद्र जडेजा आयपीएल 2022 मधून बाहेर?

रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे आयपीएल 2022 मधून बाहेर जावे लागू शकते.

सकाळ ऑनलाईन टीम

चेन्नई सुपर किंग्जला एक मोठा जडेजाच्या रूपाने मोठा झटका बसू शकतो. जो स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. सुत्राच्या माहितीनुसार रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे आयपीएल 2022 मधून बाहेर जावे लागू शकते. चेन्नईच्या संघात यापूर्वीही अनेक बदल करण्यात आले आहेत. दीपक चहरही दुखापतीमुळे आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशाप्रकारे सीएसकेसाठी हा दुसरा मोठा धक्का असू शकतो.(Ravindra Jadeja Out The IPL 2022)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता. रवींद्र जडेजाच्या शरीराच्या वरच्या भागाला दुखापत झाली आहे. या सामन्यात सीएसकेला पराभवचा सामना करायला लागला. दुखापतीमुळे जडेजाला कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातून बाहेर व्हावे लागले होते. त्या सामन्यात चेन्नईने दमदार विजय मिळवला आहे. दुखापतीमुळे रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावे लागेल. रवींद्र जडेजाचे काही दिवसांपासून दुखापतीचे मूल्यांकन केले जात आहे, पण दुखापतीमध्ये कोणतीही सुधारणा दिसत नाही. आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असून सीएसकेचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत संघला आणखी एक धक्का बसू शकतो. CSK ला IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, परंतु RCB आणि राजस्थान रॉयल्सने जर पुढील सामना जिंकला तर चेन्नईचे बाहेर पडणे जवळपास निश्चित होईल.

आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जडेजा दमदार फॉर्मसह प्रवेश करणार होता. याच कारणामुळे त्याला CSK चे कर्णधारपद मिळाले होते, पण त्याची कामगिरी आणि संघाची कामगिरी खराब होती. अशा परिस्थितीत त्याने पुन्हा एमएस धोनीकडे कर्णधारपद सोपवले. कर्णधारपद सोडल्यानंतर तो दोन सामन्यांत खेळला, मात्र दुसऱ्या सामन्यात झेल घेताना तो जखमी झाला आणि आता तो स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT