Riyan Parag | IPL 2024 Sakal
IPL

Riyan Parag: 'सामन्यापूर्वी तीन दिवस बेडवर पेन किलर्स खात...', RR च्या विजयाचा हिरो रियान परागचा मोठा खुलासा

IPL 2024, RR vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेल्या रियान परागने तो सामन्यापूर्वी आजारी असल्याचा खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Riyan Parag News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. जयपूरला झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 12 धावांनी रोमांचक विजय मिळवला.

राजस्थानचा हा या हंगामातील दुसरा विजय आहे. राजस्थानच्या या विजयात 22 वर्षीय रियान परागने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला या सामन्यातील सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. या सामन्यानंतर त्याने सांगितले की तो गेले काही दिवस आजारी होता.

परागने या सामन्यात 45 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 84 धावांची नाबाद खेळी केली. ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे. त्याच्या याच खेळीमुळे राजस्थानला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 185 धावांपर्यंत पोहचता आले.

या सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर पराग म्हणाला, 'भावना नियंत्रणात ठेवल्या आहेत. आई इकडे आली आहे. तिने गेल्या 3-4 वर्षात माझा संघर्ष पाहिला आहे. मलाही माहित आहे की माझी स्वत:बद्दल काय मतं आहेत. ती मतं मी शुन्यावर बाद होवो किंवा नाही, तरी बदलणार नाहीत.'

परागने देशांतर्गत क्रिकेटमधील फॉर्मचाही फायदा झाल्याचेही सांगितले. तो म्हणाला, 'माझ्यासाठी हा क्रिकेटचा हंगामही चांगला गेला आहे, माझी यंदाची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही चांगली झाली, ज्याची मला मदत झाली आहे.'

त्याच्या खेळीबद्दल तो म्हणाला, 'पहिल्या चार फलंदाजांपैकी एकाने तरी 20 षटकांपर्यंत फलंदाजी करण्याची गरज होती. खेळपट्टीवर चेंडू खाली राहत होता आणि थांबून येत होता. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने चांगली फलंदाजी केलेली.'

तो पुढे म्हणाला, 'मी खूप मेहनत घेतली आहे. मी गेले 3 दिवस बेडवर पडून होतो. मी पेनकिलर्स खात होतो. मी आजच उठलो आणि मी खूपच आनंदी आहे.'

दरम्यान, या सामन्यात 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकात 5 बाद 173 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Sangli Miraj Kupwad Politics : जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील एकत्र; महायुतीचा गेम! दोन माजी महापौरांना लावले गळाला

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT