Royal Challengers Bangalore IPL 2023 Squad Esakal
IPL

IPL 2023 RCB : पराभवानंतर RCB संघात बदल! फाफने देशबांधवाला केले पाचारण, पाटीदारही...

अनिरुद्ध संकपाळ

Royal Challengers Bangalore IPL 2023 Squad : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कोलकाता नाईट रायडर्सने 81 धावांनी पराभव केल्यानंतर आरसीबीने आपल्या संघात काही बदल केले आहेत. केकेआरच्या शार्दुल ठाकूरकडून जोरदार धुलाई झाल्यानंतर आरसीबने आपल्या ताफ्यात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वेन पार्नेलला सामील करून घेतले. तसेच वैशाक विजय कुमारचा देखील समावेश केला आहे.

आरसीबीने ट्विट करून दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वेन पार्नेल या आठवड्यात आरसीबीच्या ताफ्यात दाखल होत असल्याची माहिती दिली. अनेक शक्यतांची चर्चा होत असताना आरसीबीने दुखापतग्रस्त रीसे टॉप्लेच्या जागी आफ्रिकेच्या वेन पार्नेलला आपल्या संघात सामावून घेतला आहे. वेन पार्नेल हा आरसीबी विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स याच्यात सोमवारी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

आरसीबीचा हेड कोच संजय बांगरने केकेआरविरूद्धच्या सामन्यावेळीच सांगितले की, 'रीसे टॉप्ले हा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. आम्ही त्याला परत मैदानावर उतरण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याला पुढच्या उपचारांची गरज आहे. आम्ही त्याच्या रिप्लेसमेंटची लवकरच घोषणा करू.'

आरसीबीने दुसऱ्याच दिवशी वेन पार्नेल टॉप्लेची रिप्लेसमेंट असेल अशी घोषणा केली. वेन पार्नेलने आयपीएल 2023 च्या लिलावासाठी आपली बेस प्राईस 75 लाख ठेवली होती. मात्र तो अनसोल्ड राहिला होता. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज हा आफ्रिकेकडून नवीन चेंडू टाकतो. याचबरोबर डेथ ओव्हरमध्ये देखील तो गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे तो टी 20 साठी योग्य गोलंदाज आहे. त्याने अनेक टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो फलंदाजीत देखील चांगले योगदान देऊ शकतो.

आरसीबीने रीसे टॉप्लेबरोबरच धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदार या दुखापतग्रस्त फलंदाजाची देखील रिप्लेसमेंट दिली आहे. गेल्या हंगामातील आरसीबी स्टार रजत पाटीदारची जागा विशाक विजय कुमार घेणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT