IPL 2023 Play Off RCB Weather Forecast
IPL 2023 Play Off RCB Weather Forecast  esakal
IPL

IPL 2023 Play Off RCB : आरसीबी प्ले ऑफमध्ये जाणार; बंगळुरूचं पिच अन् हवामान काय म्हणतंय?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Play Off RCB Weather Forecast : आयपीएल 2023 च्या लीग स्टेजमधील फक्त 2 सामने शिल्लक आहेत. हंगामातील शेवटच्या सुपर संडेला शेवटचा सामना हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि पॉईंट टेबलची टॉपर गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. आरसीबी सध्या जरी चौथ्या क्रमांकावर असली तरी त्यांना प्ले ऑफ गाठण्यासाठी आपला शेवटचा सामना जिंकावाच लागणार आहे.

आरसीबीचा विराट कोहली आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला असून त्याला साथ देणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसने तर यांदाच्या हंगामात 600 पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. मात्र असे असले तरी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीला मुंबई इंडियन्सशी स्पर्धा करावी लागणार आहे. कारण सध्या 14 गुण झालेले मुंबई, राजस्थान आणि आरसीबी असे तीन संघ आहेत. यात मुंबई आणि आरसीबीला 16 गुणांपर्यंत पोहचण्याची संधी आहे. मुंबईला सनराईजर्सचे आणि आरसीबीला गुजरातचे आव्हान पार करायचं आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने 13 सामन्यातील 9 सामने जिंकून 18 गुण घेतले आहेत. गुजरात प्ले ऑफ गाठणारी पहिली टीम झाली आहे. त्यामुळे गुजरात आपली विजय घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्यात विराट कोहली, फाफ ड्युप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल कशी कामगिरी करतात हे पाहणे गरजेचे आहे. कारण गुजरातची गोलंदाजी तगडी आहे. तसेच आरसीबीचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराजचा देखील गुजरातविरूद्ध कस लागणार आहे.

बंगळुरूच्या पाटा खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार हे नक्की. त्यामुळे दोन्ही संघापौकी कोणत्या संघाची फलंदाजी चांगली होईल आणि जो संघ कमी धावा देण्यात यशस्वी ठरेल तो विजयी होईल. सामन्यादिवशी हवामान कसे असेल याचा विचार केला तर सामन्यावेळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे ही आरसीबीसाठी फारशी चांगली बातमी नाहीये.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT