Ruturaj Gaikwad Become first CSK captain in the last five years to score a half-century
Ruturaj Gaikwad Become first CSK captain in the last five years to score a half-century Esakal
IPL

Ruturaj Gaikwad CSK vs KKR : आश्चर्य! कर्णधार ऋतुराजनं तब्बल 5 वर्षांनी केला सीएसकेकडून केला 'हा' कारनामा

अनिरुद्ध संकपाळ

Ruturaj Gaikwad Record Half Century CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने कर्णधार झाल्यानंतर आपले पहिले अर्धशतक ठोकले. कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सनी पराभव करत चेन्नईने आपली गाडी पुन्हा विजयीपथावर आणली.

ऋतुराज गायकवाडने 58 चेंडूत नाबाद 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने विजयात अँकर इनिंग खेळण्याची भुमिका निभावली. दुसरीकडून 18 चेंडूत 28 धावा चोपून शिवम दुबेने सीएसकेचा विजय सोपा केला. डॅरेल मिचेलनेही 25 धावांचे आक्रमक योगदान दिलं. याचबरोबर केकेआरचा सलग विजयाचा धडाका देखील चेन्नईने रोखला.

(Ruturaj Gaikwad Become first CSK captain in the last five years to score a half-century)

सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सीएसकेसाठी एक मोठा आणि आश्चर्यकारक कारनामा केला. तो गेल्या पाच वर्षाच आयपीएलमध्ये चेन्नईकडून अर्धशतकी खेळी करणारा पहिला कर्णधार ठरला. यापूर्वी एमएस धोनीने 2019 मध्ये सीएसकेचा कर्णधार म्हणून अर्धशतक ठोकलं होतं. धोनीनं 2022 च्या हंगामात देखील अर्धशतक ठोकलं होतं. मात्र त्यावेळी संघाचं नेतृत्व रविंद्र जडेजा करत होता.

सीएसकेला गेल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरं जाव लागलं होतं. मात्र केकेआरला 137 धावात रोखत चेन्नईने आपल्या तिसऱ्या विजयाची पायाभरणी केली. सीएसकेकडून रविंद्र जडेजाने 18 धावात 3 विकेट्स घेतल्या तर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या तुषार देशपांडेने देखील 33 धावात 3 विकेट्स घेत विजयात आपलं मोठं योगदान दिलं.

स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट मुस्तफिजूर रहमानला आज खेळण्याची संधी मिळाली होती. पथिरानाच्या जागेवर तो प्लेईंग 11 मध्ये आला. त्याने 22 धावात 2 विकेट्स घेत चेन्नईच्या विजयाला हातभार लावला. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यर एकटा भिडला.

त्यानं संघाची अवस्था 5 बाद 85 धावा अशी झाली असताना 32 चेंडूत 34 धावांची खेळी केली. त्यामुळे केकेआर शतक पार जाऊ शकला. गोलंदाजीत वैभव अरोराने सीएसकेचे दोन फलंदाज बाद करत आपली चुणूक दाखवली.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT