Ruturaj Gaikwad CSK vs PBKS  esakal
IPL

Ruturaj Gaikwad CSK vs PBKS : मी 10 टॉस हरलोय मात्र... पुन्हा नाणेफेक गमावल्यानंतर ऋतुराजचं मोठं वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Ruturaj Gaikwad Losing Toss IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात ऋतुराज चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार झाल्यापासून सातत्याने नाणेफेक हरतोय. याचा फटका चेन्नईला पाईंट टेबलमध्ये होताना दिसतोय. आजही पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने नाणेफेक गमावली.

पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात सॅम करनने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराजने परत एकदा नाणेफेक गमावली. त्यानंतर ऋतुराज म्हणाला, 'आम्ही आमच्या प्रोसेसनुसारच खेळणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी योग्यरित्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत.'

ऋतुराज पुढे म्हणाला की, 'आम्ही विरोधी संघाच्या ट्रॅक रेकॉर्डचा फारसा विचार करत नाही. आम्ही आमच्या कामगिरीकडे लक्ष देत आहोत. यंदाच्या हंगामात आम्हाला दुखापतींचा फार फटका बसला. आम्हाला आमच्या संघात नाईलाजाने बदल करावे लागले. मी नाणेफेक गमावण्याबद्दल एवढंच म्हणू शकतो की मी 10 नाणेफेकी हरल्या आहेत. मात्र 5 सामन्यात विजय मिळवला आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. आम्ही संघात एक बदल केला आहे. फिझच्या ऐवजी सँटनर संघात आला आहे.'

चेन्नई सुपर किंग्ज प्लेईंग 11 :

अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरेल मिचेल, शिवम दुबे, मोईन अली, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकिपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.

चेन्नई सुपर किंग्ज इम्पॅक्ट सब :

समीर रिझवी, सिमरजीत सिंग, शेख राशीद, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT