Sanju Samson 200th Match  esakal
IPL

Sanju Samson 200th Match : संजूचा 200 वा सामना मात्र सवाई मानसिंगवर पिवळं वादळ पाहून काय म्हणाला RR कर्णधार?

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson 200th Match : आयपीएलच्या 37 व्या सामन्यात आज पॉईंट टेबलमधील टॉपर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. विशेष म्हणजे आजचा संजू सॅमसनचा हा राजस्थानकडून खेळतानाचा 200 वा आयपीएल सामना आहे. तो गेली 10 वर्षे राजस्थानकडून खेळत आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर संजू सॅमसनला त्याच्या 200 व्या सामन्याबद्दल वाचारणा झाली. संजू त्यावेळी म्हणाला की, 'आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही आमच्या ताकदीनुसार खेळू आम्ही धावांचा बचाव करू. राजस्थानकडून 200 वा सामना खेळताना खूप भारी वाटत आहे. 10 वर्षे खेळत असल्याने भारी वाटतंय.'

यानंतर संजूने सवाई मानसिंग स्टेडियमवरील पिवळ्या वादळाबद्दलही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'आम्हाला इथं आज गुलाबी रंग वरचढ ठरेल असे वाटत होते. मात्र पिवळा रंग मोठ्या प्रमाणावर आहे. याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे.' संजूने आजच्या सामन्यासाठी संघात असलेल्या बदलाबद्दलही माहिती दिली. तो म्हणाला की ट्रेंट बोल्ट आजचा सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी अॅडम झाम्पाला संधी देण्यात आली आहे.

चेन्नईने 5 सामने जिंकून 10 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर राजस्थान रॉयल्स 8 गुणांवर अडकली आहे. चेन्नईने आपले शेवटचे तीनही सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला गेल्या दोन सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. चेन्नईचा थला महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याची कुणकुण चाहत्यांना लागली आहे. त्यामुळे सीएसके जरी प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राऊंडवर खेळत असली तरी तेथे चेन्नईचे पर्यायाने धोनीचे चाहते तुफान गर्दी करत आहेत.

Sports Latest News)

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT