Sheldon Jacksons Sakal
IPL

"शेल्डन जॅक्शनमध्ये धोनीसारखीच क्षमता"

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने दमदार सुरुवात केलीये. त्यांनी दोन सामन्यातील विजयासह स्पर्धेत दिमाखदार खेळ दाखवण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. संघ लयीत दिसत असताना आता KKR चे मुख्य कोच ब्रँडन मॅकुलमने यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सनची (Sheldon Jacksons) तुलना थेट भारताचा माजी आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी (MS Dhoni) केलीये.

यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात शेल्डन जॅक्सन याने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या लढतीत विकेटमागे चपळाई दाखवली होती. त्याच्या या कामगिरीनं ब्रँडन मॅकुलम यांना चांगलेच प्रभावित केले आहे. CSK चा फलंदाज रॉबिन उथप्पाचे त्याने जबरदस्त स्टंम्पिंग केली होती.

शेल्डन जॅक्सनने आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलेले नाही. देशांतर्गत क्रिकटमध्ये तो प्रकाशझोतात राहिला आहे. आयपीएलमध्ये याआधी तो 2013 आणि 2014 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा सदस्यही राहिला आहे. ब्रँडन मॅकुलम यांनी जॅक्सनचा खेळ दिवसांदिवस सुधारत असल्याचे म्हटले आहे.

जॅक्सनची क्षमता धोनीसारखी

स्टार स्पोर्टसच्या वृत्तानुसार KKR चे मुख्य कोच ब्रँडन मॅकुलम म्हणाले की, "शेल्डनच्या कामगिरीत दिवसांदिवस सुधारणार होत आहे. त्याचे वय 35 झाले असली तरी मागील दोन वर्षांत तो कमालीची कामगिरी करत आहे. त्याच्या बॅटिंगमध्येही धमक आहे. त्याची बरोबरी आंद्रे रसेलची बरोबरी करता येणार नाही. पण तो त्या धाटणीतला खेळाडू आहे, असेही ब्रँडन मॅकुलम यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT