Shimron Hetmyer Shine Rajasthan Royals Defeat Punjab kings  esakal
IPL

PBKS vs RR :हेटमायरची हिटिंग! पंजाब जिंकता जिंकता हरलं

अनिरुद्ध संकपाळ

Shimron Hetmyer Shine Rajasthan Royals Defeat Punjab kings : आजच्या सामन्यातला पंजाब किंग्जचा संघ म्हणजे पेपरच्या आदल्या रात्री नाईट मारून अभ्यास करणारी पोरं. मात्र पेपर सोडवताना हीच पोरं अशी काही गोंधळतात की नंबरात येणं सोडा पास होण्याचे देखील वांदे होतात.

पंजाबनं आज शेवटची तीन षटकं सोडली तर अत्यंत सुमार दर्जाची फलंदाजी केली. निम्मा संघ 74 धावात गारद झाल्यानंतर आषुतोष शर्मानं शेवटच्या षटकात संघासाठी 36 धावा केल्या नसत्या तर पंजाब 147 धावांपर्यंत पोहचलीच नसती.

बरं ही काही विनिंग टोटल नव्हती. त्यात राजस्थान रॉयल्सनं धडाक्यात सुरूवात करत सामन्यावर पकड निर्माण केली होती. मात्र कगिसो रबाडानं मोक्याच्या क्षणी दोन दोन सेट फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडले अन् राजस्थानवर दबाव आला.

दबाव असा आला की राजस्थान सामना हरणार असंच वाटत होतं. कारण राजस्थानला शेवटच्या दोन षटकात 20 धावांची गरज होती. हेटमायर अन् रोव्हमन पॉवेल क्रिजवर असले तरी खेळपट्टी काही फलंदाजीला फारशी पोशक नव्हती. त्यामुळं या 20 धावा देखील मोठ्या वाटत होत्या.

स्टँडिंग कॅप्टन सॅम करनने स्वतः 19 वं षटक टाकण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन चेंडूतच पॉवेलनं करनला घाम फोडली. त्यानं सलग दोन चौकार मारत सामना 10 चेंडूत 12 धावा असा आणला. अखेर सॅम करननं तिसऱ्या चेंडूवर पॉवेलला बाद करत पुन्हा पंजाबच्या आशा जिवंत केल्या.

त्यानंतर दोन चेंडूत दोन सिंगल धावा झाल्या. अन् करननं केशव महाराजला शेवटच्या चेंडूवर बाद केलं. असं वाटलं आज पंजाबचा दिवस आहे.

शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना अर्शदीपनं हेटमायरला फारशी संधी न देता पहिले दोन चेंडू डॉट घालवले. आता पंजाबच जिंकणार असं चित्र निर्माण झालं.

राजस्थानला 4 चेंडूत 10 धावा करायच्या होत्या. एवढ्यात हेटमायरनं तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत अर्शदीपचा बीपी वाढवला. यात पुढच्या चेंडूवर हेटमारयनं दोन धावा घेत स्ट्राईक आपल्याकडं ठेवलं.

सामना 2 चेंडूत 4 धावा असा आला होता. हेटमायरला कसं रोखायचं याचं प्लॅनिंग सुरू होतं. मात्र हेटमायरनं पाचव्या चेंडूवर हे प्लॅनिंग फिसटवलं. त्यानं थेट षटकार ठोकत सामनाच संपवला.

आजच्या सामन्यात पंजाबनं झुंजार खेळ केला खरा मात्र त्यांनी वेळ निघून गेल्यावर धडपड केल्यानं त्यांच्या हाती विजय लागला नाही. दुसरीकडं राजस्थाननं शाहण्या मुलांसरखं आधीच पेपरमधील अवघड प्रश्नांची तयारी करून ठेवली होती. सोप्या प्रश्नांचे मार्क चुकणार नाहीत याची काळजी देखील घेतली होती. त्यामुळं बटलर, अश्विन अशी दिग्गज मंडळी नसतानाही राजस्थाननं पंजाबला त्यांच्याच घरात घुसून पराभवाचं पाणी पाजलं.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT