Shreyas Iyer kkr vs srh toss  esakal
IPL

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

KKR vs SRH IPL 2024 Final : नाणेफेक हैदराबादनं जिंकली मात्र अय्यरच्या वक्तव्यानं कमिन्सचं वाढलं टेन्शन

अनिरुद्ध संकपाळ

KKR vs SRH IPL 2024 Final Toss : आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात नाणेफेकीवेळी मोठा ड्रामा झाला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने कॉईन टॉस करण्याबरोबरच स्वतः भोवती गिरकी मारली. यामुळं नाणेफेकीचा औपचारिक कार्यक्रम देखील रंजक झाला.

श्रेयस अय्यरने जरी नाणेफेकीवेळी अतरंगी कृत्य केलं असलं तरी त्याचा फायदा काही त्याला झाला नाही. नाणेफेक तर सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं जिंकली. त्यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कमिन्सच्या या निर्णयामुळं थोडं आश्चर्य वाटलं कारण जर दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडलं तर खेळपट्टी फलंदाजीला पोषक होईल. श्रेयस अय्यर बोलताना म्हणाला की, नाणेफेक जिंकली असती तर आम्ही पहिल्यांदा गोलंदाजीच केली असती असं म्हणत कमिन्सचं टेन्शन वाढवलं.

अय्यर म्हणाला, 'जर आम्ही नाणेफेक जिंकली असती तर आधी गोलंदाजी केली असती. खेळपट्टी कशी खेळणार आहे याची आम्हाला चांगली कल्पना आहे. ही लाल मातीची खेळपट्टी आहे. आम्ही आमचा शेवटचा सामना यासारख्याच खेळपट्टीवर खेळलो होतो.

आम्हाला वर्तमानात रहावं लागेल. बेसिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आमचा प्लॅन अमलात आणला पाहिजे. संघातील प्रत्येक खेळाडू त्याची जबाबदारी जाणतो. हा मोठा सामना आहे. आमच्या संघातील अनेक खेळाडू पहिल्यांदाच फायनल खेळत आहेत. टेन्शन आहे मात्र ही एक चांगली संधी देखील आहे. आम्ही आमच्या संघात एकही बदल केलेला नाही.'

कमिन्स नाणेफेकीनंतर म्हणाला की, 'आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगली खेळपट्टी दिसत आहे. आम्ही परवाचा सामना वेगळ्या खेळपट्टीवर खेळला होता. त्या सामन्यात दव पडलं नव्हतं. प्रत्येकवेळी एकच स्टाईल चालत नाही. मात्र ती चालली तर खूप नुकसान करून जाते. जवळपास तोच संघ घेऊन खेळतोय फक्त समादच्या ऐवजी शाहबाज अहमद संघात आला आहे.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

Mumbai News: मुंबई कोस्टल रोडसाठी 9 हजार झाडे तोडणार! बीएमसीचा मोठा निर्णय; वाचा प्रकल्पाचा सविस्तर आराखडा

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Latest Marathi News Live Update :जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

SCROLL FOR NEXT