Sunil Gavaskar Advice To RCB  Esakal
IPL

RR vs RCB IPL 2024 : आरसीबीला जिंकण्यासाठी काय करायला हवं? गावसकरांनी दिला कानमंत्र... फायद्याचा ठरणार?

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar RR vs RCB IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगळुरूची कामगिरी काही चांगली झालेली नाही. त्यांनी आपले 4 पैकी 3 सामने गमावले असून आता त्यांचा सामना तगड्या राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. यादरम्यान, भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी विजय मिळवण्यासाठी आरसीबीला एक सल्ला दिला आहे.

सुनिल गावसकर म्हणता की आरसीबीने धावांचा पाठलाग करत टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे हंगामातील त्यांची स्थिती थोडी सुधारेल.

मिडविकेट स्टोरी या कार्यक्रमावेळी सुनिल गावसकर म्हणाले की, 'नक्कीच नाणेफेकीचा कौल आपल्या हातात नसतो. मात्र जर शक्य झालं तर आरसीबीने धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घ्यावा. तो त्यांचा स्ट्राँग पॉईंट आहे. मला असं वाटतं की त्यांनी जर धावांचा पाठलाग केला तर त्यांना विजयाची अधिक संधी आहे.'

गावसकर यांनी आरसीबीच्या संघर्ष करणाऱ्या गोलंदाजांना देखील चिमटा काढला. आरसीबी चेस करताना लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध थोडक्यात हरली. पंजाब किंग्जविरूद्ध त्यांनी सामना जिंकला.

गावसकर यांनी टी 20 क्रिकेटबद्दल देखील आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी टी 20 क्रिकेटमुळे पारंपरिक क्रिकेटमध्ये एक मनोरंजनाचा फॅक्टर अॅड झाला असल्याचे सांगितले.

गावसकर टी 20 क्रिकेटबद्दल म्हणाले की, 'आधुनिक क्रिकेट हे हार्ड मात्र मनोरंजक आहे. आता चेंडू टाकण्यात फार काही नावीन्य नाहीये. मात्र अनेक शॉट्स खेळले जात आहेत. स्विच हिट, रिव्हर्स स्कूप असे अनेक फटके आहेत. चेंडूची चकाकी घालवण्याची आमच्या काळातील संकल्पना इथं वापरली जात नाही.'

कसोटी क्रिकेटबद्दल विषय निघाल्यावर गावसकर यांनी कसोटी क्रिकेट मरणार नाही असं सांगितले. ते म्हणाला की, 'कसोटी क्रिकेट हे संपत चाललेलं नाही. ते तग धरून आहे. तीन-चार देश तर एकमेकांविरूद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. इतर देश तीन सामन्यांची मालिका खेळत आहेत. त्यामुळे माझ्या मते या गोष्टी कसोटी क्रिकेटला पुढे घेऊन जातील.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT