Rahul Tewatia esakal
IPL

Rahul Tewatia GT vs MI : निवडसमितीने यावर लक्ष ठेवायला हवं... गावसकरांनी राहुलचं केलं तोंडभरून कौतुक

अनिरुद्ध संकपाळ

Rahul Tewatia GT vs MI : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात स्लॉग ओव्हरमध्ये राहुल तेवतियाने पुन्हा एकदा धमाका केला. त्याने 18 व्या षटकात एक षटकार अन् दोन चौकारांसह 19 धावा चोपल्या. या खेळीवर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर जाम खुश झाले. त्यांनी निवडसमितीला राहुल तेवतियाच्या खेळीवर लक्ष ठेवण्यास सांगितले.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यात स्लॉग ओव्हरमध्ये कोणीतरी आक्रमक खेळून एक सन्मानजक धावसंख्या उभारण्याची गरज होती. ही जबाबदारी डावखुऱ्या राहुल तेवतियाने आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 15 चेंडूत 22 धावा केल्या. त्याने अति आक्रमकपणा न दाखवता खराब चेंडूवरच मोठे फटके मारले.

राहुल तेवतियाच्या या स्ट्रेटजीवर सुनिल गावसकर खुश झाले. ते म्हणाले की, निवडसमितीने आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी निवडसमितीने राहुल तेवतियावर लक्ष ठेवलं पाहिजे.'

आयपीएल 2024 मधील खेळीवरच भारताची निवडसमिती जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवडणार आहे. संघातील निवडीसाठी खेळाडूंची आयपीएल 2024 मधील कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे निवडसमिती देखील आयपीएलवर बारीक नजर ठेवून आहे.

राहुल तेवतिया सारखे खेळाडू देखील टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळवू शकतात. त्याने मॅच फिनिशर म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे त्याचे टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याची आशा वाढली आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT