KKR vs GT Vijay Shankar esakal
IPL

Vijay Shankar : शंकरने तिसरा डोळा उघडला, गुजरात शानदार विजयासह अव्वल स्थानावर विराजमान

अनिरुद्ध संकपाळ

KKR vs GT Vijay Shankar : कोलकाता नाईट रायडर्सने ठेवलेले 180 धावांचे आव्हान गुजारात टायटन्सने 17.5 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 49 तर विजय शंकरने आक्रमक 51 धावांची खेळी केली. त्याला डेव्हिड मिलरने 18 चेंडूत 32 धावा करत चांगली साथ दिली. केकेआरने गुजरातला त्यांच्या घरच्या मैदानावर मात दिली होती. आता त्याचा वचपा काढत गुजरातने केकेआरला त्यांच्याच घरात लाळवले. या विजयाबरोबरच गुजरातने 12 गुण घेत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

कोलकाता नाईट रायडर्सने गुजरातसमोर विजयासाठी 180 धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरातची तगडी बॅटिंग लाईनअप पाहिली तर हे आव्हान त्यांच्यासाठी फारसे अवघड नव्हते. मात्र केकेआरचे फिरकीपटूही दमदार असल्याने सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. परंतु गजरातचा सलामावीर शुभमन गिलने गुजरातचा हा धावांचा पाठलाग सुकर केला.

वृद्धीमान साहा 10 धावा करून बाद झाल्यानंतर त्याने कर्णधार हार्दिक पांड्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. गुजरात 10 षटकांच्या आतच शंभरीजवळ पोहचला होता. मात्र हार्दिक पांड्या 20 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलही 35 चेंडत 49 धावा करून बाद झाला. त्याचे अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकले.

हर्षित राणा आणि सुनिल नरेनने गुजरात टायटन्सला पाठोपाठ दोन धक्के दिल्याने सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. मात्र या अपेक्षेवर विजय शंकरने पाणी फेरले. त्याने आल्या आल्या आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याला डेव्हिड मिलरची साथ लाभली. या दोघांनी 87 धावांची नाबाद भागीदारी रचत गुजरातला 18 व्या षटकात विजय मिळवून दिला.

विजय शंकरने 24 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर मिलरने 18 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. विजय शंकरने 5 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने 212 चा स्ट्राईक रेट राखत तुफान फटकेबाजी केली.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सने अखेर केकेआरचा वारू रोखण्यात यश मिळवले. इडन गार्डनवर नाणेफेक जिंकून त्यांनी कोलकात्याला 179 धावातच रोखले. केकेआरकडून सलामीवीर रहमनुल्ला गरबाजने 39 चेंडूत 81 धावांची तडाखेबाज खेळी केली. तर आऊट ऑफ फॉर्म असलेला आंद्रे रसेल देखील आजच्या सामन्यात फॉर्ममध्ये आला. त्याने 19 चेंडूत 34 धावांची खेळी केली. मात्र मोहम्मद शमी (3), नूर अहमद (2) आणि जोशुआ लिटिल (2) यांनी केकेआरच्या इतर फलंदाजांना जखडून ठेवले. त्यामुळे केकेआरला 200 पारचे टार्गेट ठेवता आले नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT