Virat Kohli News Marathi  sakal
IPL

Virat Kohli : चिन्नास्वामीवर कोहलीने पुन्हा रचला इतिहास! टी-20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीच्या नावावर क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड आहेत.

Kiran Mahanavar

IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीच्या नावावर क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड आहेत. आता त्याने आयपीएल 2024 च्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या पंधराव्या सामन्यात आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 100 सामने खेळणारा कोहली आता पहिला भारतीय बनला आहे.

विराट कोहलीनंतर एका मैदानावर सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा भारतीय खेळाडू म्हणजे रोहित शर्मा आहे. त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 80 सामने खेळले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमएस धोनीने चेपॉकमध्ये 69 सामने खेळले आहेत.

चिन्नास्वामीवर विराट कोहलीचा फलंदाजीचा पराक्रम अतिशय उत्कृष्ट राहिला आहे. येथे खेळल्या गेलेल्या 100 सामन्यांच्या 96 डावांमध्ये फलंदाजी करताना विराटने 39.95 च्या सरासरीने आणि 141.95 च्या स्ट्राइक रेटने 3,276 धावा केल्या आहेत. यामध्ये 25 अर्धशतके आणि 4 शतकांचा समावेश आहे.

आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली फॉर्ममध्ये दिसत आहे. विराटने लखनऊविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी 3 सामन्यांच्या 3 डावात 90.50 च्या सरासरीने 141.4 च्या स्ट्राईक रेटने 181 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रायन परागसह विराट पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने या मोसमात दोन अर्धशतके झळकावली आहेत. विराटची नाबाद 83 ही मोसमातील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT