Yashasvi Jaiswal Virat Kohli  esakal
IPL

Yashasvi Jaiswal Virat Kohli : यशस्वी जैसवालच्या रेकॉर्डब्रेक खेळीवर विराटची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal Virat Kohli : अवघ्या 21 वर्षाच्या यशस्वी जैसवालने डोक्यावर इंडियन कॅप नसतानाही यंदाच्या आयपीएल हंगामात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम गोलंदाजांची चटणी केली. आज केकेआरविरूद्धच्या सामन्यात तर यशस्वी जैसवालने सर्व हद्द पार करत 13 चेंडूत अर्धशतकी खेळी करत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने केएल राहुल आणि पॅट कमिन्सचा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैसवालने आयपीएलमध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय संघातील विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया आली. विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत यशस्वीची पाठ थोपटली. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, 'मस्त! खूप दिवसांनी सर्वोत्तम फलंदाजी पाहिली. यशस्वी जैसवाल काय गुणवत्ता आहे.' ही स्टोरी राजस्थान रॉयल्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत GOAT चे शिक्कामोर्तब! अशी प्रतिक्रिया दिली.

कोलकाता नाईट रायडर्सचे 150 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने हे आव्हान 13 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर यशस्वी जैसवाल फक्त 13 चेंडूत 50 धावा ठोकून शांत बसला नाही. त्याने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची तडाखेबाज भागीदारी रचली. यशस्वी जैसवालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा चोपल्या. त्याला संजू सॅमसनने नाबाद 48 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी सामना 9 विकेट्स आणि तब्बल 41 चेंडू राखून जिंकला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

Latest Marathi News Live Update : गावठी दारू अड्ड्यावर धाड; 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

MSRTC: सर्व एसटी बसचे रूपांतर ई-बसमध्ये होणार, महामंडळ २०० चार्जिंग स्टेशन उभारणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT