Virat-Kohli-Ishan-Kishan 
IPL

इशानच्या धडाकेबाज खेळीआधी विराटने सांगितली होती 'ही' गोष्ट

विराज भागवत

फॉर्मच्या शोधात असलेल्या इशानने ठोकल्या ८४ धावा

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज इशान किशनने शुक्रवारी स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात ८४ धावांची तुफानी खेळी केली. मुंबईने हा सामना ४२ धावांनी जिंकला. मात्र धावांची सरासरी (Net Run Rate) न राखू शकल्याने त्यांना प्लेऑफ मध्ये प्रवेश करता आला नाही. इशानला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा किताब मिळाला. त्यानंतर इशानने एक महत्त्वाचे वक्तव्य केले. "आगामी T20 World Cup स्पर्धेसाठीच्या संघात तुझी निवड सलामीवीर म्हणून झाली आहे" अशी माहिती त्याला खुद्द कर्णधार कोहलीने दिली असल्याचे त्याने म्हटले.

भारताने गेल्या महिन्यात T20 विश्वकरंडकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यात इशान किशन आणि रिषभ पंत या दोन यष्टीरक्षकांचा समावेश आहे. सामनावीर म्हणून गौरविण्यात आल्यानंतर इशानला विराटबद्दलच्या चर्चेबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, "टी-२० विश्वकरंडकापूर्वी तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असणे अधिक चांगले आहे. मी माझ्या संघासाठी (मुंबई) काही धावा केल्या. ज्यामुळे आम्ही २३५ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यांना देऊ शकलो. विराटने मला सांगितलं की तुला संघात सलामीवीर म्हणून घेतलं आहे. त्याने म्हटल्याप्रमाणे मला सलामीला खेळायला नक्कीच आवडेल. पण आयत्या वेळी मला इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली, तरी ती जबाबदारीही मी स्वीकारण्यास तयार आहे."

Ishan-Kishan-Batting

दरम्यान, यंदाच्या IPL मध्ये इशान किशनने खास कामगिरी केली. मुंबईच्या संघाला राजस्थानने अवघ्या ९१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने नवव्या षटकातच लक्ष्य गाठले आणि संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. इशान किशनने २५ चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. इशान किशन ४४ धावांवर असताना विजयासाठी २ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी इशान किशनने उत्तुंग षटकार लगावत सामना तर जिंकलाच पण आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्यासोबतच, इशानने मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना आपल्या १,००० धावांचा टप्पा पूर्ण केला. याआधी नवी खेळाडूंनी मुंबईकडून वैयक्तिक १,००० धावा पूर्ण केल्या होत्या. इशान किशन मुंबईकडून एक हजार धावांचा टप्पा गाठणारा दहावा खेळाडू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

Satara: धक्कादायक! 'मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार'; फलटण तालुक्यातील प्रकार, विवस्त्र फोटो पोस्ट अन्..

NCERT New History Book: बाबर क्रूर विजेता तर औरंगजेब हा मंदिरे तोडणारा; ‘एनसीईआरटी’च्या आठवीच्या नव्या पुस्तकातील माहिती

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा खमंग 'गोड ढोकळा', सोपी आहे रेसिपी

Satara News:'महाबळेश्वरात अतिक्रमण हटविताना गोंधळ'; शासकीय कामात अडथळा, आठ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

SCROLL FOR NEXT