Why CSK not picked Suresh Raina revealed by CEO Kasi Viswanath  esakal
IPL

CSK ने रैनाला वाऱ्यावर सोडण्याचे दिले कारण; इरफान देखील भडकला

अनिरुद्ध संकपाळ

चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) आपली 12 वर्षे देणाऱ्या सुरेश रैनावर (Suresh Raina) यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Auction) अनसोल्डचा शिक्का बसला. सीएसकेने घरवापसी मोहिमेतून रैनाला वगळले. यावरून सोशल मीडियावर सीएसकेवर चांगलीच टीका होत आहे. सुरेश रैना आणि चेन्नईचा थलायवा एमएस धोनी यांच्या याराना तसा बराच पुराना आहे. मात्र कारकिर्दिच्या उतरत्या काळात ही जोडी फुटली. दरम्यान, टीकेचे धनी झालेल्या चेन्नईने सुरेश रैनाला लिलावात लावारिस सोडण्याचे कारण सांगितले.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ (Kasi Viswanath) यांनी सुरेश रैनाला खरेदी न करण्यामागे एक रणनीती होती असे सीएसकेच्या यूट्यूब चॅनलला सांगितले. काशी विश्वनाथ म्हणाले की, सुरेश रैनाला खरेदी केले नाही याची अपराधी भावना आमच्या मनात आहेच. रैनाचे संघात नसणे निराशाजनक आहे. तो गेल्या 12 वर्षापासून संघासोबत आहे. मात्र तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की, तो आमच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये बसत नव्हता.

आयपीएल लिलावात सुरेश रैनावर कोणत्याच संघाने बोली न लावली नाही हे चाहत्यांना आवडलेले नाही. याचबरोबर काही माजी खेळाडूंना देखील हे खटकले आहे. भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) फ्रेंचायजींच्या या निर्णयाने दुःखी आहे. तो ट्विट करून म्हणाला की, 'आम्ही काही विदेशी खेळाडूंना 40 वर्षापर्यंत आयपीएल खेळताना पाहिले आहे. रैना 35 वर्षाचा आहे... एक खराब हंगाम.' असे ट्विट केले.

सुरेश रैनाने आपल्या आयपीएल कारकिर्दित 205 सामन्यात 5528 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाचा 2021 हंगाम चांगला गेला नव्हता. त्यामुळे देखील इतर फ्रेंचायजींनी रैनाचा विचार केला नसावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT