Yashasvi Jaiswal Impact Player  esakal
IPL

Yashasvi Jaiswal PBKS vs RR : यशस्वी जयस्वालला वगळलं.... दुखापत की अजून दुसरं कारण?

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal PBKS vs RR : आयपीएल 2024 च्या 27 व्या सामन्यात आज पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसनने आपल्या संघात अनेक बदल केले असून सलामीवीर यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर आणि आर अश्विन सारख्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

मात्र यशस्वी जयस्वालला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे का नवीन प्रयोग करायचे म्हणून त्याला संघातून वगळण्यात आलं आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

राजस्थान रॉयल्स हे यशस्वी जयस्वालला आजच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याची शक्यता आहे. आयपीएल 2024 मध्ये धडाकेबाज सलामीवीर यशस्वी त्याच्या उत्तम फॉर्ममध्ये राहिलेला नाही. 5 मॅचमध्ये जयस्वाल केवळ 63 धावा करू शकला आहे, त्याची सर्वाधिक धावसंख्या 26 आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ :

संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

राजस्थानची इम्पॅक्ट राखीव खेळाडू :

यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलेर कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, अबिद मुश्ताक

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT