KL Rahul Fail In 3rd T20 World Cup 2022 Match  ESAKAL
क्रीडा

KL Rahul : 'राहुलला सर्व भारतीय संघातून त्वरित काढून टाका'

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Twitter Troll T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताची तडगी फलंदाजी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात पार ढेपाळली. नशिब सूर्यकुमार यादवने आक्रमक 68 धावांची खेळी करून भारताला सन्मानजनक धावसंख्येजवळ पोहचवले. मात्र भारताचे केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली आजच्या सामन्यात मोठी खेळी करू शकले नाहीत. केएल राहुल तर यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग तिसऱ्या सामन्यात फेल गेला आहे. त्यामुळे ट्विटवर क्रिकेट चाहत्यांनी राहुलवर चांगलाच जाळ काढला.

केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 9 धावा करून माघारी परतला. केएल राहुलने तिसऱ्या षटकात वेन पार्नेलला षटकार मारत आपले खाते उघडले होते. मात्र 12 चेंडूत 9 धावा केल्यानंतर त्याला लुंगी एन्गिडीने पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. केएल राहुल वर्ल्डकपमधील सलग तिसऱ्या सामन्यात फेल गेला. यानंतर ट्विटवर नेटकऱ्यांनी केएल राहुलवर मीम्स आणि टीका करण्यास सुरूवात केली. एका नेटकऱ्याने तर केएल राहुलला त्वरित भारताच्या सर्व फॉरमॅटमधील संघातून बाहेर काढा अशी मागणीच केली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 9 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत 40 चेंडूत 68 धावांची खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहितने 15 तर विराटने 12 धावा केल्या. या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने 4 तर वेन पार्नेलने 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT