MS Dhoni gifted jersey to Pakistan pacer Haris Rauf Sakal
क्रीडा

MS Dhoni कडून पाकिस्तानी क्रिकेटला मिळालं खास गिफ्ट!

सुशांत जाधव

भारतीय संघाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) क्रिकेट जगतातील लोकप्रिय खेळाडूपैकी एक आहे. क्रिकेट चाहतेच नाही तर क्रिकेटरही धोनीचे फॅन्स आहेत. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनात धोनीबद्दल आदर असल्याचे अनेक सामन्यादरम्यान पाहायलाही मिळाले आहे. त्यात जर धोनीनं एखाद्याला गिफ्ट मिळालं तर त्याच्यासाठी ही गोष्ट अविस्मरणीयच ठरते. पाकिस्तान संघाचा क्रिकेटर हॅरिस राउफ ( (Haris Rauf) ) याच्याबाबतीत असेच काहीसे घडलं आहे.

महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानचा युवा जलदगती गोलंदाज हॅरिस राउफ (Haris Rauf) याला एक स्पेशल गिफ्ट पाठवलं आहे. धोनीने त्याला चेन्नई सुपर किंग्जची जर्सी दिली आहे. राउफने हे गिफ्ट मिळाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्याने धोनीने चेन्नई सुपर किंग्जची आपली सात नंबरची जर्सी दिल्याचा फोटो हॅरिस राउफने शेअर केलाय.

धोनीविषय काय म्हणाला पाकिस्तानी खेळाडू

राउफने ट्विटरच्या माध्यमातून धोनीचे आभार मानले आहेत. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय दिग्गज आणि कॅप्टन कूल धोनीकडून मला खास गिफ्ट मिळाले. हा मी माझा सन्मान समजतो. रसेलचही आभार! असे ट्विट करत त्याने धोनीने दिलेल्या गिफ्टबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

बीबीएलमध्ये खेळतोय राउफ

सध्याच्या घडीला पाकिस्तानी क्रिकेटर बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. यंदाच्या हंगामात तो मेलबर्न स्टार्सचे प्रतिनिधीत्व करताना दिसतोय. बिग बॅश लीगमध्ये आतापर्यंत त्याने 2 सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आहेत. 2 जानेवारीला पर्थ स्कॉचर्सकडून राउफने 40 धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या होत्या. तर मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 26 धावा खर्च करुन एक विकेट घेतली होती.

राउफची पाकिस्तानकडून कामगिरी

राउफने पाकिस्तान संघाकडून वनडे आणि टी-20 सामने खेळले आहेत. अद्याप त्याला कसोटीत संधी मिळालेली नाही. त्याने पाकिस्तानकडून 34 टी20 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. 22 धावा खर्च करून 4 विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. 8 वनडे सामन्यात त्याच्या खात्यात 14 विकेट्सची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra : गणेशोत्सव राज्याचा उत्सव, अधिवेशनात मोठी घोषणा; व्यवस्थेसाठी लागेल तेवढा निधी देऊ, सांस्कृतिक मंत्री काय म्हणाले?

Bank Sale: फक्त 3 महिने...'या' सरकारी बँकेचे होणार खाजगीकरण, खरेदी करण्याच्या शर्यतीत कोण?

ENG vs IND 3rd Test: लॉर्ड्समध्ये वेगाची स्पर्धा, कोणाची तोफ धडाडणार? आर्चर vs बुमराहवर फोकस; पाहा सर्व गोलंदाजांचे रेकॉर्ड

ड्रेनेज कामात हलगर्जीपणा? पुण्यात दारूवाला पुलाजवळ ड्रेनेजचे काम सुरू असताना खांब कोसळला, शाळकरी मुलगी रक्तबंबाळ

Eknath Shinde : अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; नाराजी, निधी, तक्रार की आणखी काही प्लॅन?

SCROLL FOR NEXT