CSK-MSD
CSK-MSD 
क्रीडा

"CSKने विकत घेतलं असलं तरी लगेच संघात जागा मिळलं असं समजू नको"

विराज भागवत

वाचा, धोनीने नक्की कोणत्या खेळाडूला असं सांगितलं होतं..

IPL 2021: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा (India Tour of England) लवकर संपला. आता भारतीय खेळाडू आणि इतर काही परदेशी खेळाडू युएईमध्ये (IPL 2021 in UAE) क्वारंटाइन आहेत. IPL स्पर्धेसाठी सारे जण युएईमध्ये दाखल झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून IPL 2021चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी अतिशय वाईट कामगिरी करणारा चेन्नईचा संघ (CSK) यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सातपैकी पाच सामने जिंकून धोनीच्या संघाने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. असे असताना धोनीबद्दल (MS Dhoni) एक वेगळीच गोष्ट भारताच्या एका अनुभवी क्रिकेटपटूने सांगितली.

महेंद्रसिंग धोनी हा एक प्रतिभावान कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याची गणना होता. महेंद्रसिंग धोनी हा मैदानावर अतिशय संयमी आणि शांत असतो हे साऱ्यांनीच पाहिलं आहे. पण धोनी तितकाच स्पष्टवक्ता आहे. त्याच्या याच गुणाबद्दल एका खेळाडूने किस्सा सांगितला. CSK ने यंदाच्या हंगामात रॉबिन उथप्पाला विकत घेतले. त्यानंतर धोनीने त्याचे संघात स्वागत केले. पण त्यावेळी धोनी एक महत्त्वाची गोष्ट त्याला सांगितली.

"महेंद्रसिंग धोनीने माझं संघात स्वागत केलं. पण त्यासोबतच त्याने मला हेदेखील स्पष्टपणे सांगितलं की तुला संघात विकत घेतलंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुला संघात घेतलं जाईलच असं काहीही होणार नाही. कारण उद्या कोणी मला असं म्हटलेलं आवडणार नाही की मी जन्या ओळखीमुळे तुला संघात स्थान दिलं. त्यामुळे एक लक्षात ठेव की CSKने विकत घेतलं असलं तरी लगेच संघात जागा मिळलं असं समजू नको", असं धोनीने मला स्पष्टपणे सांगितल्याचंरॉबिन उथप्पा म्हणाला.

"धोनीने असं सगळं सांगितल्यामुळे मला गोष्ट समजली की मला माझ्या नावामुळे नव्हे तर माझ्या गेल्या हंगामातील कामगिरीमुळे संघात स्थान देण्यात आलंय. गेल्या हंगामात मी केलेली कामगिरी माझ्या उपयोगाला आली. मला धोनीने हेदेखील सांगितलं की आमच्या संघात काही असे खेळाडू आहेत जे खूप वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांची कामगिरी पाहू आणि मग काय तो निर्णय घेऊ", असंही उथप्पा म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT