MS Dhoni Video of Celebrating Chandrayaan 3 landing on Moon sakal
क्रीडा

MS Dhoni Video : भारताने इतिहास रचताच कॅप्टनकूल धोनीची खास रिऍक्शन व्हायरल

Kiran Mahanavar

MS Dhoni Video of Celebrating Chandrayaan 3 landing on Moon : बुधवारी 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. प्रत्येक भारतीयाने हा क्षण आनंदाने साजरा केला. त्याचवेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही हा क्षण साजरा केला. धोनीचा सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये धोनी ब्लू टैंक टॉप आणि जिम शॉर्ट्समध्ये दिसत आहे. या दरम्यान तो चांद्रयान-3 चे लँडिंग अतिशय शांतपणे साजरा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये धोनी त्याच्या थाईने टाळ्या वाजवताना दिसत आहे. त्याचवेळी धोनीची पत्नी साक्षीने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची मुलगी जीवा चांद्रयान-3 च्या लँडिंगचा आनंद साजरा करताना दिसत आहे.

धोनी व्यतिरिक्त अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांद्रयान-3 च्या लँडिंगबद्दल अभिनंदन केले. या यादीत दिग्गज सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंतचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये लिहिले की, "विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा." याशिवाय किंग कोहलीने ट्विट केले की, “चांद्रयान-३ च्या टीमचे अभिनंदन. तुम्ही देशाचा अभिमान वाढवला आहे. जय हिंद!"

विशेष म्हणजे चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहेत. त्याच वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. उल्लेखनीय म्हणजे, 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने संध्याकाळी 6.04 वाजता सॉफ्ट लँडिंग केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT