esakal

क्रीडा

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Namibia defeated South Africa in a thrilling T20 match : या ऐतिहासिक विजयानंतरचा नामिबियाच्या खेळाडूंचा अन् क्रिकेटप्रेमींचा जल्लोष एकदा बघाच!

Mayur Ratnaparkhe

Namibia historic win against South Africa last ball boundary : नामिबिया सारख्या नवख्या देशाने टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेसारख्या तुलनेने बलाढ्य आणि क्रिकेटमध्ये अनुभवी असणाऱ्या देशाच्या संघाला चक्क चार विकेटने पराभूत केलं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात नामिबियाच्या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर कडक चौकार लगावत क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास घडवला. या विजयानंतर नामिबियाच्या खेळाडूंचा मैदानावर एकच जल्लोष सुरू झाला. तर दुसरीकडे हा रोमांचक सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींनीही जल्लोष केल्याचे दिसून आले.

दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीस फलंदाजी करत आठ विकेट गमावून नामिबियासमोर विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल, नामिबियाच्या संघाने सहा विकेट गमावून आणि चार विकेट राखून शेवटच्या चेंडूवर चौकार मारून ऐतिहासिक विजय नोंदवला.

दक्षिण आफ्रिकेची टी-२० मध्ये असोसिएट देशाकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र नामिबियानेही आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण, नामिबियाने याआधी श्रीलंका, झिम्बाब्वे आणि आयर्लंडचा या देशांना पराभूत केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच नामिबियाचा संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात १३४ धावा केल्या. जेसन स्मिथ संघाचा सर्वाधिक ३१ धावा करणारा फलंदाज होता. तर गोलंदाजीत, रुबेन ट्रम्पेलमन नामिबियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने ४ षटकांत फक्त २८ धावा देत ३ बळी घेतले.

याचबरोबर लक्ष्याचा पाठलाग करताना, नामिबिया आधी पराभवाच्या छायेत दिसत होता. कारण, नामिबियाने ८४ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या, परंतु संघ दबावात असूनही जॅन ग्रीनने २३ चेंडूत नाबाद ३० धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून विजय हिसकावून घेतला. त्याला रुबेन ट्रम्पेलमन देखील नाबाद ११ धावा करून साथ दिली.

नामिबियाला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. जॅन ग्रीनने पहिल्या चेंडूवर षटकार मारून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव वाढवला. दुसऱ्या चेंडूवर आणखी एक धाव, तिसऱ्या चेंडूवर दोन धावा आणि चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन दोन्ही संघांना बरोबरीत आणले. यानंतर मग पाचवा चेंडू डॉट बॉल झाला, यामुळे सामना प्रचंड रोमांचक झाला. अखेर मग जॅन ग्रीनने शेवटच्या चेंडूवर कडक चौकार मारून नामिबियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि मग एकच जल्लोषही सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Nagpur News : नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे होणार परवाने रद्द

SCROLL FOR NEXT