Neeraj Chopra Inspiring Story On You Tube  esakal
क्रीडा

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा प्रवास आता युट्यूबवर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) हरियाणातील खांडरा गावापासून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेकी करण्यापर्यंतचा प्रवास युट्यूबवर (You Tube) प्रदर्शित होणार आहे. हा प्रवास युट्यूबवरील क्रिएटिंग इंडिया (Creating India) या सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

नीरज चोप्राच्या मते या उपक्रमाद्वारे तरूणांना अॅथलेटिक्स, खेळ आणि भालाफेक याबाबत सजगता निर्माण होईल अशी आशा आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वतःचा अधिकृत युट्यूब चॅनेल (You Tube Channel) सुरू करणे आणि त्यावर खेळ आणि त्याच्या आयुष्याबद्दलचा कंटेंट शेअर करणे याबरोबरच भारताच्या पुढच्या पिढीला प्रोत्साह देण्याचीही मोहीम हातात घेतली जाणार आहे.

याबाबत जेएसडब्लू स्पोर्ट्सचे सेल्स आणि मार्केटिंग प्रमुख दिव्यांशू सिंह यांनी सांगितले की, 'आम्ही या भागीदारीबाबत खूप उत्साही आहोत. युट्यूब हा नीरजसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे तो मोठ्या जनसमुदायाला त्याची प्ररणादायी कथा सांगू शकेल. सध्या व्हिडिओ फॉरमॅटची चांगली चलती आहे. भारतातील शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांमध्ये व्हिडिओला जास्त मागणी आहे. त्यामुळे आम्ही नीरज हा खेळ आणि अॅथलेटिकला या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी योग्य व्यक्ती आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT