Jimmy-N-Tweet-NZ
Jimmy-N-Tweet-NZ 
क्रीडा

पराभवानंतर न्यूझीलंड खेळाडूच्या दोन शब्दांच्या ट्वीटने खळबळ

विराज भागवत

न्यूझीलंडच्या जिमी नीशमने वन डे वर्ल्ड कपनंतरही केलं होतंं ट्वीट

T20 World Cup Final: धडाकेबाज कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला पहिला टी२० विश्वकरंडक जिंकला. न्यूझीलंडच्या संघाला ८ गडी राखून त्यांनी पराभूत केले. २०१५ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्याचा बदला घेण्याची संधी न्यूझीलंडला होती, पण त्यांना पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. २०१५ वन डे वर्ल्ड कप आणि २०१९ वन डे वर्ल्ड कप या दोन्ही स्पर्धेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर २०२१च्या टी२० वर्ल्डकपमध्येही त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशम याने एक ट्वीट करत थोडीशी खळबळ माजवली.

न्यूझीलंडचा संघ पराभूत झाल्यानंतर जिमी नीशमने केवळ दोन शब्दांचे एक ट्वीट केलं. '३३५ दिवस' असे हे दोन शब्द होते. २०१६ नंतर टी२० वर्ल्ड कप झाला नव्हता. २०२० आणि २०२२ असे दोन वर्षात दोन टी२० विश्वचषक नियोजित होते, पण कोरोनामुळे २०२०चा टी२० विश्वचषक झाला नाही. २०२१मध्ये तो वर्ल्ड कप झाला. आता ३३५ दिवसांनी २०२२चा टी२० वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. हा वर्ल्ड कप जिंकण्याचा विचार असल्याचे इरादे नीशमने स्पष्ट केले.

जिमी नीशमचे ते ट्वीट-

Jimmy-Neesham

दरम्यान, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजी दिली होती. न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलने संथगतीने २८ धावा केल्या. इतर कोणालाही मोठी खेळी उभारता आली नाही. पण केन विल्यमसनने कर्णधारपदाला साजेशी ४८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली आणि संघाला १७२ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून आधी डेव्हिड वॉर्नरने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ५३ धावा केल्या. त्यानंतर मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला पहिला टी२० विश्वचषक मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT