ICC World Cup Super League Points Table 2023
ICC World Cup Super League Points Table 2023 sakal
क्रीडा

WC Points Table: पाकिस्तानचा पराभव टीम इंडियाला धक्का! भारताचं नंबर १चं स्थान 'या' संघाने हिसकावलं

Kiran Mahanavar

ICC World Cup Super League Points Table 2023: केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने बुधवारी रात्री कराची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने पाकचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

किवी संघाने या विजयासह विश्वचषक सुपर लीग पॉइंट्स टेबलमध्ये भारताकडून नंबर 1चा स्थान हिसकावून घेतला आहे. विश्वचषक सुपर लीगमध्ये न्यूझीलंडचे आता 140 गुण झाले असून ते यादीत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. न्यूझीलंडच्या या यशामुळे भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी एक स्थान गमावले आहे. टीम इंडिया 139 गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर पाकिस्तान 130 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

पॉइंट टेबलमधील इतर संघांबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड 125 गुणांसह चौथ्या, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश 120 गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. या यादीत अफगाणिस्तान 115 गुणांसह 7व्या तर वेस्ट इंडिज 88 गुणांसह 8व्या स्थानावर आहे. सुपर लीगच्या या पॉईंट टेबलमध्ये भारतासह फक्त टॉप 8 टीम्स 2023 च्या वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरणार आहे, तर इतर दोन टीम क्वालिफायर मॅचद्वारे ठरवल्या जातील. या यादीत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका टॉप 8 च्या बाहेर आहेत, आता हे दोन संघ विश्वचषकापूर्वी कसे पुनरागमन करतात हे पाहावे लागेल.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगची ही पहिलीच आवृत्ती आहे. या लीगद्वारे भारताव्यतिरिक्त इतर 7 संघ थेट विश्वचषक 2022 साठी पात्र ठरतील. उर्वरित दोन संघ विश्वचषक पात्रता फेरीतून निवडले जातील. सुपर लीगमध्ये एकूण 13 संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघाला घरच्या मैदानावर 4 आणि बाहेर 4 म्हणजे एकूण 8 मालिका खेळण्याची संधी मिळेल. प्रत्येक मालिकेत एकूण 3 सामने होतील. विजेत्या संघाला 10 गुण मिळतील, बरोबरी/निकाल नसल्यास त्यांना 5 गुण मिळतील.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हॉन कॉनवेच्या शतकाच्या जोरावर यजमानांसमोर 262 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 182 धावांत गारद झाला. मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना १३ जानेवारीला याच मैदानावर खेळवला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT