Nicholas Pooran Fielding Video Gone Viral During 2nd ODI Against India esakal
क्रीडा

Nicholas Pooran : मालिका वाचवण्यासाठी पूरनची जीव तोडून फिल्डिंग; Video व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

त्रिनिदाद : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा (West Indies Vs India) दुसरा सामना दोन विकेट्सनी जिंकून तीन सामन्यांची मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. दरम्यान, वेस्ट इंडीजच्या संघाने मालिका वाचवण्यासाठी झुंजार खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी भारताने सामन्यावर नियंत्रण मिळवले. विंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने (Nicholas Pooran) फलंदाजीत 74 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने फिल्डिंग करतानाही स्वतःला झोकून देत मालिका वाचवण्याचा प्रयत्न करत होता. सध्या पूरनच्या या फिल्डिंगचा व्हिडिओ (Fielding Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत ज्यावेळी वेस्ट इंडीजचे 312 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर उतरला त्यावेळी भारतीय फलंदाजांची भागीदारी तोडण्यासाठी विंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने जोरदार प्रयत्न केले. अल्झारी जोसेफच्या षटकात पूरन कव्हर्समध्ये फिल्गिंड करत होता. त्यावेळी त्याने चेंडू रोखण्यासाठी जबरदस्त डाइव्ह मारला. डाइव्ह मारूनही त्याने आपल्या शरिराचा तोल सांभाळत त्याच फ्लोमध्ये थ्रो केला. या थ्रोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जरी त्याच्या या प्रयत्नामुळे फलंदाज बाद झाला नसला तरी भारतीय चाहत्यांचे ह्रदयाचे ठोके मात्र वाढवले.

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाई होपने 115 धावांची शतकी खेळी केली. तर त्याला कर्णधार निकोलस पूरनने 74 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. यामुळे वेस्ट इंडीजने 50 षटकात 6 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. भारताने हे 311 धावांचे आव्हान 49.4 षटकात पार केले. भारताकडून अक्षर पटेलने दमदार खेळी करत नाबाद 64 तर श्रेयस अय्यरने 63 धावा केल्या. संजू सॅमसनने 54 आणि शुभमन गिलने 43 धावांची खेळी केली. आता मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना 27 जुलैला खेळला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT