Parupalli Kashyap husband of Saina Nehwal Criticize BAI For Not Selecting Commonwealth Games Badminton Squad
Parupalli Kashyap husband of Saina Nehwal Criticize BAI For Not Selecting Commonwealth Games Badminton Squad esakal
क्रीडा

राष्ट्रकुलसाठी सायनाला डावलल्यानंतर नवरा कश्यप भडकला; आपलीच लोकं...

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : काही आठवड्यात सुरू होणाऱ्या राष्ट्रकुली स्पर्धेसाठी (Commonwealth Games) भारताचा बॅडमिंटन संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन राष्ट्रकुल सुवर्णपदकं जिंकणाऱ्या सायना नेहवालचा समावेश नाही. यामुळे सायनाचा पती आणि प्रशिक्षक परूपल्ली कश्यप चांगलाच भडकला. त्याने, 'सायनाचा अनादर करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्याच लोकांना कशा प्रकारे वागणूक देता हे दिसून येते.' असे म्हणत टीका केली. परूपल्ली कश्यपने देखील 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

सायना नेहवालने सिंगापूर ओपनमध्ये चीनच्या हे बिंगजिओचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर कश्यपने सायना गेल्या काही दिवसांपासून कोणत्या मानसिकतेतून जात होती हे सांगितले. कश्यप म्हणाला की, 'तिच्या डोळ्यात सतत अश्रू यायचे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी आमच्या संभाषणात संघातून डावलल्याचा मुद्दा यायचाच. अशा परिस्थितीत सराव करणे खूप अवघड असते. मानसिकदृष्ट्या तुम्ही द्विधा मनिस्थितीत असता की तुमचा लढा स्वतःच्याच लोकांविरूद्ध आहे की प्रतिस्पर्ध्याबरोबर. त्यामुळे तुमचे सामन्याला सामोरे जाण्याचे उद्दिष्टच चुकीच्या मार्गाला जावू शकते. ती एक भयानक मानसिक स्थिती असते.'

इंडिया ओपनमध्ये मालविका बनसोडने सायनाचा पराभव केला होता. त्यानंतर सायनाला संघातील स्थान गमवावे लागले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सिंगापूर ओपनमध्ये सायनासाठी पहिल्याच फेरीतील मालविका बनसोड विरूद्धचा सामना अत्यंत महत्वाचा होता. 'जानेवारी महिन्यात झालेल्या त्या एका पराभवावर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया संघातील निवड ठरवणार होती. सायनाला स्वतःला सिद्ध करायचे होते. त्यामुळे तिच्यावर दबाव होता. दुसऱ्या सामन्यात ती तुलनेने अधिक मुक्तपणे खेळली.'

कश्यप सायनाबद्दल म्हणला की, 'सायना उद्धट आहे असा काहींचा ग्रह आहे. कारण ती जास्त बोलत नाही. तिला दुसऱ्यांशी काही घेणदेण नसतं. जे काही झालं त्यामुळे तिला जास्तच प्रेरणा मिळाली. मात्र ते तिच्याशी निवडीबाबत बोलले असते आणि किमान आदर दाखवला असता तर ही परिस्थिती आली नसती. तुम्ही नियमांच्या बाबतीत कडक राहू इच्छिता हे मी समजू शकतो. मात्र संभाषण करायला काही हरकत नव्हती. कोणी तिच्या मॅसेजला रिप्लाय केलं नाही हे खूप वेदानादायी असतं.'

कश्यप म्हणाला की आपण आपल्या खेळाडूवर अविश्वास दाखवून पदक जिंकण्याची संधी गमावली आहे. दुसरीकडे असोसिएशनने जे काही झालं ते प्रक्रियेनुसारच झाल्याचं सांगितलं. सायना जो दावा करत आहेत त्यासाठी तिच्याकडे रँकिंग नाही किंवा निकाल देखील नाही.

दरम्यान, सायनाच्या सिंगापूर ओपनमधील विजयावर कश्यप म्हणाला की, 'सायना एका विजयाने समाधानी होणारी नाही. मोठ्या स्केलवर पाहिले तर हा विजय काहीच वाटणार नाही. तिला स्पर्धा जिंकायची आहे. आम्ही त्याच मार्गावर मार्गक्रमण करत आहोत. तिच्या क्षमतेच्या 30 ते 40 टक्केच ती खेळत आहे. मात्र आपण बॅडमिंटनमधील मूळ गोष्ट विसतो आहे. संघ निवडताना तुमच्यासाठी कोण पदक जिंकून आणू शकतं हे विसतो आहोत. तिने 11-12 स्पर्धा जिंकल्या आङेत. ती राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची संख्या दुप्पट करू शकली असती. निवड न होण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडायला वेळ लागतो. ज्या प्रकारे सायनाला वागणूक मिळाली आहे त्यातून ती अजून सावरलेली नाही असं मला वाटतं.'

कश्यप म्हणाला की सायनाची राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली नाही हे एका दृष्टीने चांगलेच झाले कारण आता तिला वर्ल्ड चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रीत करता येईल. तिला माहिती आहे की ती जगातील कोणत्याही अव्वल बॅडमिंटनपटूला मात देऊ शकते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT