Premier League esakal
क्रीडा

Premier League: मँचेस्टर सिटी टॉपवर; सर्वाधिक सामने जिंकण्याचाही केला विक्रम

मँचेस्टर सिटीने कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचाही केला विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : प्रीमियर लीग (Premier League) फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटी (Manchester City) पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहचली आहे. रविवारी झालेल्या सामन्यांनंतर लिव्हरपूल (Liverpool) आणि चेल्सी (Chelsea) यांच्या पॉईंट्समध्ये घट झाली आहे. मँचेस्टर सिटीने न्यूकॅसल युनायटेडवर 4 - 0 असा मोठा विजय मिळवला. रुबेन डिआस आणि जोआ कॅनसेलो यांनी पहिल्या हाफमध्ये गोल दागत आघाडी घेतली. त्यानंतर रियाद महरेझने तिसरा गोल करत ही आघाडी वाढवली. रहीम स्टेरलिंगने (Raheem Sterling) चौथा गोल करत न्यूकॅसलला अजून एक दणका दिला. विशेष म्हणजे मँटेस्टर सिटीने प्रीमियल लीगमध्ये एका कॅलेंडर वर्षात 34 सामने जिंकण्याचा विक्रमही केला. (Premier League Point Table)

मँटेस्टर सिटीचा हा सलग आठवा प्रीमियर लीगमधील विजय होता. त्यामुळे त्यांचे 44 पॉईंट झाले आहेत. त्यांचे लिव्हरपूलपेक्षा 3 पॉईंट जास्त आहेत. लंडनमध्ये झालेल्या सामन्यात टोटेनहॅम हॉट्सपर आणि लिव्हरपूल यांचा सामना 2 -2 असा बरोबरीत राहिला. टोटेनहॅम हॉट्सपरकडून हॅरी केनने (Harry Kane) 13 व्या मिनिटाला लिव्हरपूलवर पहिला गोल दागला. मात्र लिव्हरपूलच्या डिएगो जोटाने रॉबर्टसनच्या क्रॉसवर हेडद्वारे गोल करत बरोबरी साधली.

दरम्यान, लिव्हरपूलच्या (Liverpool) ट्रेंट अलेक्झांडर अरनॉल्डच्या क्रॉसवर रॉबर्टसनने 69 व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी घेतली होती. मात्र एलिसनने एक चूक केली आणि सॉन हेयुंग मिनने (Son Heung-min) रिकाम्या गोलपोस्टचा फायदा उचलत लिव्हरपूलशी बरोबरी साधली. (Premier League Point Table)

याचबरोबर चेल्साला वोलव्हरहॅम्पटन वाँडरर्स बरोबर एकही गोल मारण्यात यश आले नाही. त्यामुळे हा सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला. त्यामुळे पॉईंट टेबलमधील ते मँचेस्टर सिटी बरोबरच्या स्पर्धेत मागे पडले. पाठोपाठच्या ड्रॉ सामन्यांमुळे चेल्सा मँचेस्टर सिटीच्या (Manchester City) 6 पॉईंट्स मागे राहिली आहे. आता पॉईंट टेबलमध्ये चेल्सा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT